शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १00 मुलांना अतिसार

By admin | Updated: August 12, 2015 20:42 IST

अतिसार नियंत्रण पंधरवडा : ३४ हजार मुलांना ‘ओआरएस’चे वितरण

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २८ जुलै ते ८ आॅगस्ट या कालावधीत ‘अतिसार नियंत्रण पंधरवडा’ अभियान राबवून ० ते ६ वयोगटांतील ३७ हजार ८५६ मुलांपैकी ३४ हजार ७१२ मुलांना ओआरएस पाकिटाचे वितरण करण्यात आले. तर यामध्ये १०० मुलांना अतिसार झाल्याची माहिती देऊन त्यांच्या आरोग्यात सुधारणा करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.जिल्ह्यातील ० ते ६ वयोगटातील बालकांमध्ये होणाऱ्या अतिसार या आजारावर नियंत्रण ठेवण्याच्यादृष्टीने २८ जुलै ते ८ आॅगस्ट या कालावधीत अतिसार नियंत्रण पंधरवडा साजरा करण्यात आला. यामध्ये ० ते ६ वयोगटांतील ३७ हजार ८५६ मुलांपैकी ३४ हजार ७१२ मुलांना ओआरएसचे पाकीट वितरित करण्यात आले. तसेच यामध्ये १०० मुले ही अतिसार या आजाराने पीडित असल्याचे निष्पन्न झाले. या १०० मुलांना १४ दिवस ओआरएसचे पाकीट देऊन त्यांच्या आरोग्यात सुधारणा आणण्यात आली. प्रत्येक घराला भेट देऊन ओआरएसचे द्रावण कसे करावे, याबाबतची माहिती देण्यात आली.हिरकणी कक्षासाठी प्रत्येकी पाच हजारप्रत्येक मातेला आपल्या मुलाला समाधानाने दूध पाजता यावे यासाठी जिल्ह्यातील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हिरकणी कक्ष कार्यान्वित केले आहेत. यामध्ये सर्व सोयीसुविधा व अद्ययावतीकरणासाठी जिल्हा नियोजनमधून प्रत्येक कक्षासाठी पालकमंत्र्यांनी पाच हजार रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली. झोळीचा वापर टाळावामातेच्या कुशीमध्ये ऊब लहान मुलांसाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे बाळाला आईच्या कुशीत झोपविल्यास बाळाला आवश्यक असे हे तापमान मिळते व जंतुसंसर्ग कमी होतो. यासाठी पाळणा व झोळी पद्धतीचा वापर टाळावा, असे आवाहनही डॉ. साळे यांनी केले आहे. पंधरवड्याच्यानिमित्त जिल्ह्यातील २८८९ स्तनदा मातांना स्तनपानाबाबतचे कौशल्य, स्तनपान करण्याची पद्धत याबाबत मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती डॉ. योगेश साळे यांनी दिली.