शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्गात एकाला डेंग्यूची लागण

By admin | Updated: November 9, 2014 23:26 IST

डासांच्या फैलावाबाबत उपाययोजना कराव्यात

तालुक्यात खळबळ : इब्रामपूर येथील युवक कसई दोडामार्ग : दोडामार्ग येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या इब्रामपूर येथील संदीप यशवंत इब्रामपूर (वय ३२) याला डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने दोडामार्ग तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती दोडामार्ग वैद्यकीय अधिकारी यांनी दिली. दोडामार्ग रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी संदीप इब्रामपूर हा युवक तपासणीसाठी आला होता. तेथे त्याच्या रक्ताचे नमुने घेतल्यानंतर त्याला डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाल्याने तत्काळ गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली. यापूर्वी उसप येथील मळीक नामक युवकालाही या आजाराची लागण झाली होती. परंतु सध्या तो पूर्णपणे बरा झाला आहे. तो पुणे येथे शिक्षणासाठी वास्तव्यास होता. दोडामार्ग रुग्णालयात त्याच्यावर तातडीने उपचार झाल्याने तो बरा झाल्याची माहिती रुग्णालयातून मिळाली. काही महिन्यांपासून मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. शहरांमधील साफसफाईचा अभाव, अस्वच्छतेमुळे डेंग्यूचा फैलाव होत आहे. शहरांपाठोपाठ आता ग्रामीण भागातही लागण होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी तत्काळ औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे. (वार्ताहर)डासांच्या फैलावाबाबत उपाययोजना कराव्यातग्रामसुधार समितीतर्फे ग्रामपंचायतीला निवेदनकुडाळ : कुडाळ शहरातील रस्त्याच्या बाजूची गटारे साफ नसल्यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. याचा वेळीच बंदोबस्त न झाल्यास याचा परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर होऊ शकतो. कुडाळ ग्रामपंचायतीने याची योग्य ती खबरदारी घेऊन वेळीच औषध फवारणी व गटारातून जाणारे सांडपाणी याची योग्य व्यवस्था करावी. यासाठी कठोर योजना अंमलात आणाव्यात, अशी मागणी कुडाळ ग्राम सुधार समितीच्यावतीने कुडाळ ग्रामपंचायत सरपंच यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. डेंग्यू डासांचा प्रसार होऊ नये, म्हणून पूर्ण गावामध्ये औषधांची, धुराची फवारणी करणे, सर्व गावातील गटारे साफ करून त्यामध्ये औषध फवारणी करणे, गावांमध्ये मोठमोठ्या इमारतींतून आजूबाजूला सोडलेल्या सांडपाण्यावर ठोस उपाययोजना करावी, एसटीस्थानक, मच्छिमार्केट, ग्रामीण रुग्णालय व सार्वजनिक ठिकाणचा परिसर स्वच्छ व निर्जंतुक ठेवण्यासाठी शासनाच्यावतीने योग्य ते प्रयत्न करणे. गावातील विहिरींवर जंतुनाशक पावडर उपलब्ध करून देणे, मोठमोठ्या इमारती व हॉटेल्समध्ये सांडपाण्याची विल्हेवाट कशा रीतीने केलेली आहे, याची पाहणी करून उपाययोजना करणे. ग्रामपंचायतीने प्रसार माध्यमातून जनजागृती करावी, अशा काही उपाययोजनांचा या निवेदनात उल्लेख केलाआहे. (प्रतिनिधी)आरोग्य विभागाने काळजी घ्यावीसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची आरोग्य विभागाकडून काळजी घेऊन रोग थांबविण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष शिरसाट यांनी केली आहे.