शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणप्रकरणी शिवसैनिकावर गुन्हा

By admin | Updated: October 8, 2014 22:59 IST

काँग्रेस कार्यकर्त्याला रामगडात मारहाण

आचरा : रामगड बाजारपेठ येथे नाथ मालंडकर यांच्या घरात काँग्रेस प्रचारासंदर्भात चर्चा करीत असताना राष्ट्रीय युवक काँग्रेस रत्नागिरी सिंधुदुर्गचे उपाध्यक्ष दीपक यशवंत सांडव यांना शिवसेना कार्यकर्ते दीपक कृष्णा राऊळ (रा. निरोम) यांनी अनधिकृतपणे घरात घुसून शर्ट फाडून, हाताच्या ठोशाने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी ११.३० वाजताच्या सुमारास रामगड बाजारपेठ येथे नाथ मालंडकर यांच्या घरात घडली.या घटनेची तक्रार दीपक सांडव यांनी आचरा पोलीस ठाण्यात दाखल केली असून दीपक राऊळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दीपक सांडव व त्यांच्यासोबत सुनिल घाडीगांवकर, सतीश परुळेकर, नाथ मालंडकर हे नाथ मालंडकर यांच्या घरी काँग्रेस प्रचाराची चर्चा करीत असताना दीपक राऊळ यांनी घरात घुसून ‘तुम्ही शिवसेनेच्या विरोधात प्रचार करायचा नाही, तुमचे बघून घेईन’ अशी धमकी दिली. त्यावेळी दीपक सांडव यांनी तुम्ही तुमच्या पक्षाचा प्रचार करा. आम्ही आमचे बघू असे सांगितले असता दीपक राऊळ यांनी दीपक सांडव यांची शर्टाची कॉलर पकडून ठोशाने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली व निघून गेले.या घटनेची तक्रार दीपक सांडव यांनी आचरा पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर दीपक राऊळ यांच्यावर जबरदस्तीने घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)धमकी दिल्याप्रकरणी तक्रार दाखलकिर्लोस येथील व्यावसायिक व शिवसेना कार्यकर्ते प्रशांत नामदेव सावंत यांना काँग्रेस कार्यकर्ते राजेश हाटले यांनी दूरध्वनीवरून धमकावल्याची तक्रार आचरा पोलीस ठाण्यात प्रशांत सावंत यांनी दिली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी ५.४० वाजताच्या सुमारास घडली. शिवसेना कार्यकर्ते प्रशांत सावंत यांना काँग्रेस कार्यकर्ते राजेश हाटले यांनी फोन करून ‘मी तुला भेटायला बोलावले. तू का नाही आलास? तुला भेटायचं नसेल तर तुला १९ तारीखला दाखवतो’ अशी धमकी फोनवरून दिल्याची तक्रार प्रशांत सावंत यांनी आचरा पोलीस ठाण्यात काँग्रेस कार्यकर्ते राजेश हाटले यांच्या विरोधात दिली आहे.