शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवसात टंचाई आराखडा तयार करा

By admin | Updated: November 7, 2014 23:39 IST

संदेश सावंत यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी : नव्या पाणीटंचाई आराखड्यात गतवर्षीची शिल्लक राहिलेली कामे प्राधान्याने घ्या. येत्या १५ दिवसात संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करा. तसेच जिल्ह्यातील सर्व पक्क्या बंधाऱ्यामध्ये वेळीच पाण्याचा साठा करा, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी जलव्यवस्थापन समिती सभेत दिले.जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समिती सभा जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. यावेळी उपाध्यक्ष रणजीत देसाई, महिला व बालकल्याण सभापती स्रेहलता चोरगे, विषय समिती सभापती संजय बोंबडी, समिती सदस्य पंढरीनाथ राऊळ, संजीवनी लुडबे आदींसह खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाई जाणवते. त्यासाठी संभाव्य पाणीटंचाई आराखडाही बनविला जातो. मात्र आराखड्यातील सर्व कामे पूर्ण होत नाहीत. त्यामुळे वारंवार पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तरी चालू वर्षाचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा येत्या १५ दिवसात तयार करा. त्यामध्ये गतवर्षी होऊ न शकलेली कामे प्राधान्याने घ्या, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी सभेत दिले. जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील सुस्थितीत असणाऱ्या पक्क्या बंधाऱ्यामध्ये पाण्याचा साठा करा. प्रत्येक ग्रामपंचायतींना सूचना द्या आणि दर महिन्याला साठविलेल्या पाणीसाठ्याचा अहवाल सभागृहाला द्यावा, अशी सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी सभेत दिली. पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील विहिरीच्या कामावर प्राधान्याने लक्ष दिले जाते. मात्र नळयोजनांच्या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आवश्यक असलेल्या ठिकाणी नळयोजना होत नाहीत. तरी जास्तीत जास्त नळयोजना मार्गी लावा. त्यामध्ये असलेल्या अडचणी दूर करून जनतेला पाणी मिळाले पाहिजे यादृष्टीने सकारात्मक विचार करा, अशी सूचना अध्यक्ष सावंत यांनी केली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापही सुमारे १८ हजार कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय नसल्याचे उघड झाले आहे. तर ६० गावे अद्यापही निर्मल पुरस्कारापासून दूर आहेत, अशी माहिती सभेत देण्यात आली. तसेच ४२ सार्वजनिक शौचालयांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. लवकरच या कामांना गती येईल.विजयदुर्ग व देवगड प्रादेशिक नळपाणी योजनेवर मोठ्या प्रमाणावर दुरूस्तीसाठी निधी खर्च केला जातो. मात्र, त्यामानाने पाणीपट्टी वसुली होत नाही. या योजनांवर आतापर्यंत १३ लाखाचा निधी खर्च झाला आहे. तर ७ लाख रूपये पाणीपट्टी वसूल झाली असल्याची माहिती सभेत दिली. (प्रतिनिधी)