Coronavirus : क्वारंटाईन कालावधी १४ दिवसांचा कराा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 06:55 PM2020-07-13T18:55:21+5:302020-07-13T19:09:47+5:30

गणेशोत्सव काळात येणाऱ्या चाकरमान्यांचा क्वारंटाईन कालावधी चौदा दिवसांचा असला पाहिजे, अशी भूमिका सावंतवाडी तालुक्यातील सरपंचांच्या बैठकीत घेण्यात आली.

Coronavirus: Make the quarantine period 14 days | Coronavirus : क्वारंटाईन कालावधी १४ दिवसांचा कराा

Coronavirus : क्वारंटाईन कालावधी १४ दिवसांचा कराा

Next
ठळक मुद्देक्वारंटाईन कालावधी १४ दिवसांचा कराासिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सावंतवाडी : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीतील काही मुद्दे बरोबर आहेत. सरपंच संघटना त्याचे समर्थन करते. गणेशोत्सवाला येणाºया चाकरमान्यांचा क्वारंटाईन कालावधी चौदा दिवसांचा असला पाहिजे, अशी भूमिका सावंतवाडी तालुक्यातील सरपंचांच्या बैठकीत घेण्यात आली. तसेच गणेश आगमन ते विसर्जन कालावधीपर्यंत किमान १५ ते २० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सरपंच संघटनेच्यावतीने करण्यात आली.


जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीचे इतिवृत्त सरसकट रद्द करू नये. त्यातील सूचनांचा उपयोग याठिकाणी करण्यात यावा, अशी मागणी  येथे झालेल्या सरपंच संघटनेच्या बैठकीत करण्यात आली.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच गणेश चतुर्थीचा महत्त्वाचा सण येत आहे. त्यासाठी गावात येणाऱ्याकरमान्यांबाबत निर्णय घेण्यासाठी येथील तहसीलदार कार्यालयात तहसीलदार राजाराम म्हात्रे व गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.


या बैठकीला अनेक गावचे सरपंच उपस्थित होते. यात संजना सावंत, रुचिता सावंत, रेश्मा गावकर, वर्षा वरक, केशव जाधव, सुभाष सावंत, निधी नाईक, जयेश सावंत, सुप्रिया मडगावकर, डॉ. मनस्वी राऊळ, अपर्णा तळवणेकर, प्रतिभा गावडे, शीतल जोशी, स्नेहा मिठबांवकर, स्मिता मोरजकर, रेखा घावरे, उत्कर्षा गावकर, अक्षरा पाडलोसकर, अभिलाष देसाई, भरत मयेकर, केशव जाधव, शरद नाईक, अंकुश कदम, देवेंद्र सावंत, विजय वालावलकर, भिकाजी केणी, साक्षी तोरसकर, अक्षता आरोंदेकर आदी उपस्थित होते.


सावंतवाडी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष निरवडे सरपंच प्रमोद गावडे यांनी अनेक मुद्दे उपस्थित करून सकारात्मक चर्चा घडवून आणली. यावेळी नाणोस सरपंच वासुदेव जोशी, माडखोल सरपंच संजय शिरसाट, तांबोळी सरपंच अभिलाष देसाई, तळवडे सरपंच संदीप आंगचेकर दिनेश सावंत, वासुदेव मेस्त्री, गुंजन हिराप, शिवदत्त घोगळे, सुरेश राऊळ, रोशनी पारधी, पूजा पेडणेकर, दिनानाथ कसालकर आदींसह तालुक्यातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.


चौदा दिवस क्वारंटाईनबाबत केंद्र शासनाकडून आदेश आले आहेत. मात्र, त्यात नेमका बदल करण्याबाबत चर्चा सुरू आहे.त्या बदलाचा निर्णय सर्वच गावांना स्वीकारणे बंधनकारक राहणार आहे.

गोव्यातून चोरट्या पद्धतीने बोटीतून येणाºयांना रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे म्हणाले. गोवा आणि परजिल्ह्यातून येणाºया वाहनचालकांना बाहेर क्वारंटाईनची सोय केली जावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.


पूजा, भजन आदी गोष्टींवर बंदीचा निर्णय


यावेळी सरपंच संघटनेच्यावतीने वेगवेगळे मुद्दे मांडण्यात आले. यात गणेश चतुर्थी काळात एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यास, त्या घरापुरता कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात यावा. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्य, माहेरवाशीण, जावई यांना प्रवेश तर अन्य बाहेरून येणाºया पाहुण्यांना बंदी घालण्यात यावी, अशी कडक भूमिका यावेळी घेण्यात आली. पूजा, भजन आदी गोष्टींवरसुद्धा बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

कारवारवरून पुरोहित (भटजी) येणार असतील तर अगोदर १४ दिवस क्वारंटाईन करण्यात यावे आणि ती जबाबदारी संबंधित गावातील समितीने घ्यावी, अशी सरपंचांनी भूमिका मांडली.

शासन निर्णय सर्वांना बंधनकारक : म्हात्रे


शासन पातळीवर जो निर्णय घेतला जाईल तो सर्वांनी पाळावा. तालुक्यातील पुरोहित, मुख्याध्यापक, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांच्या मी आणि गटविकास अधिकारी वेगवेगळ्या बैठकीत गणेश चतुर्थी सण आनंदाने साजरा करण्यासाठी नियोजन करणार आहोत, असे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले.

 

 

Web Title: Coronavirus: Make the quarantine period 14 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.