Corona virus In Sindhdurg : गोवा सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची कसून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 03:57 PM2021-06-23T15:57:27+5:302021-06-23T15:59:01+5:30

Corona virus In Sindhdurg : दोडामार्ग - गोवा सीमा तपासणी नाक्यावर जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. प्रत्येकाजवळ आरटीपीसीआर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ज्याच्याजवळ प्रमाणपत्र नाही अशांना माघारी पाठविण्यात येत आहे. शिवाय काही जणांची कोरोना रॅपिड टेस्ट करून निगेटिव्ह आल्यास त्यांनाच प्रवेश दिला जात आहे.

Corona virus in Sindhdurg: Thorough inspection of vehicles at Goa border check post | Corona virus In Sindhdurg : गोवा सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची कसून तपासणी

दोडामार्ग येथील सीमा तपासणी नाक्यावर पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. (छाया : संदेश देसाई)

googlenewsNext
ठळक मुद्देगोवा सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची कसून तपासणीजिल्हा प्रशासनातर्फे सतर्कता : आरटीपीसीआर प्रमाणपत्र आवश्यक

दोडामार्ग : दोडामार्ग - गोवा सीमा तपासणी नाक्यावर जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. प्रत्येकाजवळ आरटीपीसीआर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ज्याच्याजवळ प्रमाणपत्र नाही अशांना माघारी पाठविण्यात येत आहे. शिवाय काही जणांची कोरोना रॅपिड टेस्ट करून निगेटिव्ह आल्यास त्यांनाच प्रवेश दिला जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारपासून कोरोनाचे काही निर्बंध थोडेसे शिथील केले आहेत. मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेची परिस्थिती ओढवू नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सतर्कता बाळगली जात आहे. दोडामार्ग येथील सीमा तपासणी नाक्यावरून शेजारील गोवा राज्यात जाणाऱ्यांना प्रवेश दिला जातो. परंतु गोव्यातून या मार्गे महाराष्ट्रात येणाऱ्यांना आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. शिवाय कोरोनाचे दोन डोस घेणाऱ्यांनी देखील आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. येथील सीमा तपासणी नाक्यावर आरोग्य विभाग, पोलीस विभाग व शिक्षक आपली कामगिरी चोख पार पाडीत आहेत.

जिल्ह्यातील निर्बंध काहीसे शिथिल झाले आहेत. मात्र दररोज कामानिमित्त गोव्यात ये-जा करणाऱ्यांचा प्रश्न जैसे-थे आहे. कोरोनामुळे तालुक्यातील बहुतांश युवक युवतींच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. त्यामुळे आर्थिक उत्पन्न ठप्प झाल्याने परिस्थिती बेताची बनली आहे. प्रशासनाने यावर योग्य तो तोडगा काढून ये-जा करणाऱ्यांना सवलत द्यावी अशी मागणी युवक-युवती होत आहे.

ओळखपत्राच्या आधारे गोवा राज्यात प्रवेश

शेजारील गोवा राज्यातील सीमा तपासणी नाक्यावरून ७२ तासांच्या आतील आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र किंवा कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्याचे प्रमाणपत्र असेल तर गोवा राज्यात प्रवेश दिला जात आहे. तसेच कामानिमित्त दररोज ये-जा करणाऱ्या फक्त दोडामार्ग मधील स्थानिकांना ओळखपत्राच्या आधारावर गोवा राज्यात प्रवेश करण्यासाठी मुभा देण्यात येत आहे.

 

Web Title: Corona virus in Sindhdurg: Thorough inspection of vehicles at Goa border check post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.