शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

corona virus : लॉकडाऊन काळात रेखाटली १०० चित्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 3:52 PM

वैभववाडी तालुक्यातील लोरे मोगरवाडी शाळेचे शिक्षक युवराज पचकर यांनी जपलेल्या आणि जोपासलेल्या चित्रकलेकडे पाहता येईल.

ठळक मुद्देलॉकडाऊन काळात रेखाटली १०० चित्रेप्राथमिक शिक्षक युवराज पचकर यांचा उपक्रम

वैभववाडी : कोणतीही कला अथवा छंद हे माणसाला जीवनाकडे वेगळ्या अंगाने पाहण्याचा दृष्टीकोन देत असतात. तर कधी कधी हीच कला किंवा छंद कालांतराने समाज प्रबोधनाचे माध्यमही बनते. याचेच उदाहरण म्हणून वैभववाडी तालुक्यातील लोरे मोगरवाडी शाळेचे शिक्षक युवराज पचकर यांनी जपलेल्या आणि जोपासलेल्या चित्रकलेकडे पाहता येईल.कोरोनामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शासनाने लॉकडाऊनचा पर्याय वापरला. या काळात अनेकांनी आपले छंद जोपासले तर काहींनी वेगळ्या वाटा निर्माण केल्या.

युवराज पचकर यांनीही कुठलेही प्रशिक्षण न घेता आपले शालेय कामकाज पाहत मिळालेल्या वेळेचा सदुपयोग केला. केवळ आवड म्हणून जोपासलेल्या चित्रकलेच्या छंदातून कोरोना संकटात सामाजिक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. पचकर यांनी पेन्सिल, स्केचपेन, रंगीत खडू, वॉटर कलर किंबहुना सहज उपलब्ध होणाऱ्या व हाती सापडेल त्या एकेका रंगातून विविधांगी छटा कागदावर रेखाटून त्या समाज माध्यमांद्वारे जनतेच्या मनावर उमटविण्याचा प्रयत्न केला.

 

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पचकर यांनी जवळपास १०० हून अधिक चित्रे रेखाटली आहेत. या चित्रांद्वारे कोरोना विषाणूबाबत जनजागृती केली. वैयक्तिक व सामूहिक कोणती काळजी घ्यावी? शासनाच्या नियमांचे पालन कसे करावे? कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींशी कसे वागावे? बिकट परिस्थितीत माणुसकी कशी जपावी? असे विविध संदेश त्यांनी या चित्रांतून दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या या कल्पकतेचे कौतुक केले गेले. त्यांच्या या सामाजिक दृष्टीकोनाचे सर्वत्र कौतुक होत असून गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, मुख्याध्यापक किशोर पेडणेकर यांनी त्यांना प्रोत्साहन दिले आहे.

केवळ कल्पकतेतून पचकर यांनी स्वत:ची चित्रकला विकसित करून या कलेचा ग्रामीण मुलांना गुणवत्ता वाढीसाठी कसा उपयोग करता येईल, यासाठी प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने खास शालेय विद्यार्थ्यांसाठी भविष्यात चित्रप्रदर्शन भरविण्याचा संकल्प युवराज पचकर यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याartकलाsindhudurgसिंधुदुर्ग