शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
5
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
6
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
7
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
8
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
9
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
10
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
11
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
12
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
13
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
14
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
15
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
16
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
17
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
18
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
19
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
20
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown :त्या ३४ युवकांना अखेर दिला जिल्ह्यात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 18:18 IST

दोडामार्ग सीमेवरून गोव्यात माघारी पाठविलेल्या सिंधुदुर्गातील ३४ युवक-युवतींना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रविवारी जिल्ह्यात प्रवेश दिला. दोडामार्ग सीमेवर आल्यानंतर प्रत्येक तालुक्यातील असलेल्यांना त्या तालुक्यात पाठविण्यात आले व विलगीकरणात कक्षात ठेवले आहे.

ठळक मुद्देत्या ३४ युवकांना अखेर दिला जिल्ह्यात प्रवेशधुरी यांनी केला युवक-युवतींना दिलेला शब्द खरा

दोडामार्ग : दोडामार्ग सीमेवरून गोव्यात माघारी पाठविलेल्या सिंधुदुर्गातील ३४ युवक-युवतींना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रविवारी जिल्ह्यात प्रवेश दिला. दोडामार्ग सीमेवर आल्यानंतर प्रत्येक तालुक्यातील असलेल्यांना त्या तालुक्यात पाठविण्यात आले व विलगीकरणात कक्षात ठेवले आहे.

गोवा-फोंडा वेर्णा येथे काम करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३४ युवक-युवती आंतरराज्य प्रवेश बंद झाल्याने गोवा येथे अडकून पडले होते. याकडे शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी लक्ष वेधून या सर्वांना त्यांच्या मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणण्यासाठी पुढाकार घेतला. शनिवारी दोडामार्ग सीमेवर त्यांना आणले होते.

मात्र, आंतरराज्य प्रवेश बंदी असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाशिवाय प्रवेश दिला जाणार नाही असे सांगून पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांनी प्रवेश करू दिला नाही. त्यामुळे गोवा शासनाने त्यांना परत नेत आपल्या निगराणीखाली ठेवले. त्यामुळे विरोधकांनी धुरी यांच्यावर टीका केली.

मात्र, बाबुराव धुरी यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी त्या युवक युवतींना माघारी आणण्याचा ध्यास धरला. आमदार दीपक केसरकर, शिवसेना खासदार विनायक राऊत, यांच्याशी तसेच प्रशासनाकडे प्रयत्न सुरू ठेवले होते. त्या सर्वांना जिल्हा प्रवेश देण्याची अधिकृत परवानगी घेतली. त्यानुसार रविवारी त्या ३४ जणांना जिल्हा प्रवेश देण्यात आला.

प्रशासनाच्या वाहनाने दुपारी ३ वाजता दोडामार्ग येथे आणून त्यांची आरोग्य तपासणी करून ते ज्या तालुक्यातील होते त्या तालुक्यात पाठवून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच ते शासनाच्या निगराणीखाली रहाणार असल्याचे सांगण्यात आले. धुरी यांनी त्या युवक-युवतींना दिलेला शब्द खरा करून टीका करणाऱ्यांचे तोंड बंद केले आहे. गोवा येथे अडकून पडलेल्या त्या ३४ युवक-युवतींना प्रशासनाच्या वाहनाने सिंधुदुर्गच्या सीमेत आणण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गgoaगोवा