शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्गात काँग्रेसला धक्का

By admin | Updated: September 13, 2014 23:48 IST

श्रीपाद नाईक यांची उपस्थिती : दोन पंचायत समिती सदस्यांचा भाजपात प्रवेश

कसई दोडामार्ग : पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य महेश गवस व उपसभापती आनंद रेडकर या दोघांनी आज शनिवारी भाजपात प्रवेश केला. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत या दोघांनी भाजपामध्ये प्रवेश केला असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी आज दोडामार्ग येथे पत्रकार परिषदेत दिली. दोडामार्ग येथील भाजपा संपर्क कार्यालयात आज भाजपाचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर, प्रवीण गवस आदी उपस्थित होते.केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत गोवा व कर्नाटक सीमेवर शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रीय काँगे्रसचे विद्यमान पंचायत समिती सदस्य महेश गवस, उपसभापती आनंद रेडकर यांनी कुठलीही मागणी वा अट न ठेवता भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपा जिल्हा परिषद सदस्य राजन म्हापसेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून गवस व रेडकर यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे दोडामार्ग पंचायत समितीतील महायुतीची ताकद वाढली आहे. दोडामार्ग पंचायत समिती सभापती, उपसभापती कोण होणार याचा निर्णय विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे रविवारी घेणार आहेत. आनंद रेडकर व महेश गवस यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला आहे. गवस व रेडकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल, असे काळसेकर यांनी सांगितले. महेश गवस व आनंद रेडकर यांच्या भाजपा प्रवेशावेळी राजन म्हापसेकर, बांदा सरपंच शीतल राऊळ, सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष मंदार कल्याणकर, दोडामार्ग शहराध्यक्ष चेतन चव्हाण आदी उपस्थित होते. (वार्ताहर)