शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कासारवेली येथे अपघातानंतर वाहक-चालकास मारहाण

By admin | Updated: July 7, 2015 01:01 IST

सात तास वाहतूक ठप्प : वृद्धाच्या पायावरून गेले बसचे चाक

रत्नागिरी : तालुक्यातील साखरतर येथे एका वृद्धाच्या पायावरून एस.टी. बसचे चाक गेल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने बसचालक आणि महिला वाहकाला जोरदार मारहाण केली. या मारहाणीमुळे संतप्त झालेल्या एस.टी. चालक-वाहकांनी बसफेऱ्या बंद केल्याने तब्बल सात तास शहरी आणि सहा तास ग्रामीण वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यात असंख्य प्रवाशांचे विशेषत: शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल झाले. सकाळी दहा वाजता बंद झालेल्या बसफेऱ्या सायंकाळी पाच वाजता पूर्ववत झाल्या. रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली येथे सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. त्यात जैनुद्दीन शिरगावकर (वय ६५, रा. साखरतर) जखमी झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या साखरतर ग्रामस्थांनी बसचालक सचिन सावंत आणि वाहक मयूरी सुर्वे यांना बेदम मारहाण केली. जोपर्यंत जखमीवर उपचार होत नाहीत, तोपर्यंत चालक-वाहक आणि बस जागची हलू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. तोपर्यंत घटनास्थळी पोहोचलेल्या एस. टी. अधिकाऱ्यांनी शिरगावकर यांना शासकीय रुग्णालयात आणले. उपचार सुरू झाल्यानंतर बस अपघातस्थळावरून सोडण्यात आली. या मारहाणीचे वृत्त तत्काळ रत्नागिरी एस. टी. आगारापर्यंत आले. त्यामुळे चालक-वाहक एकत्र झाले आणि त्यांनी शहरी बस वाहतूक बंद केली. सकाळी दहा वाजल्यापासून ही वाहतूक ठप्प झाली. पाठोपाठ अकरा वाजता ग्रामीण फेऱ्याही बंद करण्यात आला. चालक-वाहकाला मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा आणि त्यांना अटक करा, अशी मागणी करीत सर्वच चालक-वाहकांनी चक्काजाम केला. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी सामंजस्याची भूमिका घेत चालक-वाहकांची समजूत काढली. चर्चेच्या तब्बल तीन फेऱ्यांनंतर चालक-वाहकांनी बससेवा पूर्ववत सुरू करण्याची तयारी दर्शविली आणि पाच वाजता वाहतूक पूर्ववत सुरू झाली. (प्रतिनिधी)