शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

काळसे गोसावीवाडीत पूल ढासळला

By admin | Updated: October 30, 2014 00:46 IST

संपर्क पूर्णपणे खंडित : अतिवृष्टीमुळे भरावाला तडे

चौके : मालवण तालुक्यातील काळसे गोसावीवाडीमध्ये जाण्यासाठी वाडीनजिक असणारा पूल चिरे वाहतूक करणारा डंपर रुतून कलंडल्यामुळे ढासळला. सुदैवाने चिऱ्यांनी भरलेला डंपर ओढ्यात न कोसळता पुलाच्या कठड्याला अडकून राहिला. त्यामुळे त्यावर बसलेल्या कामगारांचा जीव वाचला आणि मोठा अनर्थ टळला.यामध्ये डंपरचे नुकसान झाले असून पुलाच्या एका बाजूचा भराव आणि त्याच्या दोन्ही दिशेचे बांधकाम कोसळल्याने गोसावीवाडीतील ग्रामस्थांचा बाहेर पडण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. रात्री उशिरा क्रेनच्या सहाय्याने डंपर बाहेर काढण्यात यश आले. गोसावीवाडीमध्ये ये-जा करण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्यामुळे तोच मार्ग कोसळल्याने वाडीतील लोकांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटल्यासारखाच आहे. वाडीतील काहीजणांची वाहने पुलाच्या पलिकडे अडकल्याने त्यांना नोकरी- व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यासाठी पर्याय शोधावा लागत आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांना यावरून पाठवता येत नसल्याने त्यांना शाळेत जाणे मुश्किल होणार आहे. त्यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वी तसेच लवकरात लवकर संबंधित बांधकाम विभागाने या कोसळलेल्या पुलाचे बांधकाम करून रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यासाठी वाडीतील ग्रामस्थांनी अनेक नेत्यांकडे या पुलाच्या पुनर्बांधणीची मागणी केली होती. गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूल आणखी कमकुवत होऊन अखेर ढासळला आहे. अपघात झाल्यानंतर वाडीतील तरूण सतिश गोसावी, जितेंद्र गोसावी, तुषार गोसावी, सुमन गोसावी, सुहास गोसावी, ओंकार गोसावी, भरत गोसावी, रंगनाथ आजगावकर, संतोष सावंत यांनी मदतकार्य केले. (वार्ताहर)