शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

कासार्डे तिठा येथील पुलाला बॉक्सवेल करणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 10:44 AM

highway Kankavli Sindhudurg-कणकवली तालुक्यातील कासार्डे तिठा येथील कासार्डे हायस्कूलसमोर महामार्गावरील पुलाला बॉक्सवेल न घातल्याने कासार्डे माध्यमिक, उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची तसेच ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.

ठळक मुद्देकासार्डे तिठा येथील पुलाला बॉक्सवेल करणे आवश्यक ग्रामस्थांच्यावतीने संजय पाताडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी मागणी

तळेरे : कणकवली तालुक्यातील कासार्डे तिठा येथील कासार्डे हायस्कूलसमोर महामार्गावरील पुलाला बॉक्सवेल न घातल्याने कासार्डे माध्यमिक, उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची तसेच ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज शाळेत येताना आणि शाळा सुटल्यानंतर जीव धोक्यात घालून वाहनांचा अडथळा पार करीत प्रवास करावा लागत आहे.

या पुलाला हायस्कूलसमोर बॉक्सवेल मंजूर करून विद्यार्थी व ग्रामस्थांची होणारी गैरसोय त्वरित दूर करावी अशी लेखी मागणी कासार्डेतील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांचे प्रतिनिधी संजय पाताडे यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे. तसेच याबाबत दखल घेतली गेली नाही तर कासार्डे पंचक्रोशीतील जनतेला तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी आपल्या निवेदनात दिला आहे.कासार्डे तिठा येथे फोंडाघाटहून येणारा हमरस्ता मिळतो. तेथून‌ सुमारे ३०० मीटरवर कासार्डे तिठ्यापर्यंत नेहमीच विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. वास्तविक ज्या ठिकाणी फोंडाघाटातून येणारा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला मिळतो त्याच ठिकाणी हायस्कूलसमोर एक बॉक्सवेल असणे आवश्यक होते.या ठिकाणी बॉक्सवेल मंजूर व्हावा ही मागणी महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून ग्रामस्थांकडून केली जात आहे. मात्र, महामार्ग प्राधिकरणाने याकडे कानाडोळा केल्याने बॉक्सवेल मंजूर झालेला नाही. असा आरोप पालक व ग्रामस्थांमधून केला जात आहे.कासार्डे माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवी ते पदवीपर्यंत शिक्षण दिले जात असल्याने याठिकाणी सुमारे १२०९ पेक्षा अधिक विद्यार्थी नियमित ये-जा करीत आहेत. या विद्यार्थ्यांना नियमित प्रवास करताना या अरुंद रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे.कासार्डेतील बहुतांश आस्थापना पुलाच्या पश्चिमेला असून कासार्डेच्या पश्चिमेला मोठी बाजारपेठ, दवाखाने, पेट्रोल पंप, पोस्ट कार्यालय, दूरध्वनी कार्यालय, बँक, पशुवैद्यकीय दवाखाना, दूध डेअरी, पोलीस ठाणे, सर्व गॅरेज, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्था या आस्थापना आहेत. तसेच पुलाच्या पूर्वेला कासार्डे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने ओझरम, दारुम, तळेरे या गावातील जनतेला याच अरुंद रस्त्याने प्रवास करावा लागतो.खासदार, आमदार यांनाही सह्यांचे निवेदनया संदर्भात कासार्डेचे सरपंच बाळाराम तानवडे, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांचे प्रतिनिधी संजय पाताडे तसेच नव तरुण उत्कर्ष मंडळ कासार्डेचे अध्यक्ष सहदेव खाडये यांनी १५०० ग्रामस्थांच्या सह्यांचे लेखी निवेदन खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, कणकवली मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे, महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी, पोलीस अधीक्षक, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग रत्नागिरीचे अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय खारेपाटणचे सहाय्यक अभियंता आणि या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण के.सी.सी. कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर यांना देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गpwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्गSchoolशाळाKankavliकणकवली