शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांत भिंत पाडा, अन्यथा मी पाडेन : राणे

By admin | Updated: December 29, 2014 23:47 IST

प्रशासनाला इशारा : आरोंदा जेटीला काँॅग्रेसचा विरोधच

सावंतवाडी : आरोंदा जेटीला काँग्रेसचा तीव्र विरोध आहे. हा विरोध डावलून कोण काम करीत असेल तर शांत राहू नका, असे कार्यकर्त्यांना सुनावत येत्या दहा दिवसांत जेटीची भिंत प्रशासनाने न काढल्यास मी स्वत: ती भिंत हटविण्यासाठी आरोंदा येथे जाईन. पुढची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची राहील, असा स्पष्ट इशारा माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते नारायण राणे यांनी दिला आहे. सावंतवाडी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी माजी खासदार नीलेश राणे, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, तालुकाध्यक्ष संजू परब, डॉ. जयेंद्र परुळेकर, राजू मसूरकर, संदीप कुडतरकर, सभापती प्रमोद सावंत, प्रमोद गावडे, प्रियांका गावडे उपस्थित होते.यावेळी राणे म्हणाले, राज्यमंत्र्याला किती अधिकार असतात हे त्यांनी अगोदर पाहावे. राज्यमंत्री अधिकाऱ्यालाही आदेश देऊ शकत नाही. मात्र, आताचे पालकमंत्री गटविकास अधिकारी आणि सहायक जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठका घेतात आणि जेवणावळी वाढतात. या जेवणावळीचा खर्च तसेच हारतुऱ्यांचा खर्च हा ठेकेदाराच्या खिशातून होत असून याची चौकशी झाली पाहिजे. या सर्व ठेकेदारांची यादी माझ्याकडे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आरोंदा जेटीवरून आमच्या माणसांवर कोणी कितीही गुन्हे दाखल करू दे अगर धमक्या देऊ दे, आरोंदावासीयांच्या मागे मी ठामपणे उभा आहे. काम करणारे किती दिवस पोलीस संरक्षण घेतात, हेच पाहायचे आहे, असे सांगत दोन टक्क्यांवर दलाली करणाऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवायची, असा सवालही राणे यांनी केला. (प्रतिनिधी)देसाई यांच्यावर टीकानारायण राणे यांनी यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावरही जोरदार टीका केली. मी या जिल्ह्यातीलच आहे. उपरा नाही, त्यामुळे मी मालकच असून, पालकमंत्र्यांनी हे उपऱ्यांना सांगावे, मला नाही. देसाई यांनी प्रथम उद्योग विभागाचा अभ्यास करावा आणि नंतर बोलावे. विमानतळ करतानाच रस्ते करायचे का, असे विचारणाऱ्यांचे किती हे अज्ञान, असे सांगत पुन्हा माझ्यावर टीका केल्यास उसन्या दाताच्या कवळ्या माघारी जाणार नाहीत, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.