Kolhapur: आंबोली येथील कावळेसादच्या दरीत कोसळलेल्या पर्यटकांचा मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 13:00 IST2025-06-28T13:00:14+5:302025-06-28T13:00:54+5:30

दीडशे फूट खोल दरीतून काढला मृतदेह: कोल्हापूर जिल्हा परिषदेतील कर्मचारी 

Body of tourist who fell into Kawalesad valley in Amboli found | Kolhapur: आंबोली येथील कावळेसादच्या दरीत कोसळलेल्या पर्यटकांचा मृतदेह सापडला

Kolhapur: आंबोली येथील कावळेसादच्या दरीत कोसळलेल्या पर्यटकांचा मृतदेह सापडला

आंबोली : आंबोली कावळेसाद येथे दरीत कोसळलेल्या कोल्हापुरातील पर्यटकांचा मृतदेह सापडला. आज, शनिवारी एनडीएआरएफ तसेच स्थानिक गेळे ग्रामस्थ पोलिसांनी संयुक्त मोहिम राबवून दीडशे फूट खोल दरीतून राजेंद्र बाळासाहेब सनगर (वय-४५, चिले कॉलनी कोल्हापूर) यांचा मृतदेह बाहेर काढला.

आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठीकोल्हापूर येथील जिल्हा परिषदचे अधिकारी व कर्मचारी आले होते. त्यातील राजेंद्र सनगर हे कावळेसाद पॉईंट येथे रेलिगच्या बाजूला फोटो काढत असताना तोल जाऊन दरीत कोसळले. ही घटना काल, शुक्रवारी सायंकाळी घडली होती. दरीत कोसळलेल्या तरूणाच्या शोधासाठी पोलिस तसेच गेळे ग्रामस्थांकडून प्रयत्न केले. मात्र पाऊस, दाट धुके अन् अंधारामुळे शोधकार्यात अडचण आली.

वाचा- सेल्फीसाठी गेले अन् ३०० फूट खोल दरीत कोसळले

आज, शनिवार सकाळ पासून एनडीएआरएफ तसेच स्थानिक गेळे ग्रामस्थ पोलिस यांनी संयुक्त मोहीम राबवली. एनडीएआरएफचे पथक पोलिसांच्या मदतीने दरीत उतरले होते. यावेळी सणगर यांचा मृतदेह दीडशे ते दोनशे फूट खाली आढळून आला. 

Web Title: Body of tourist who fell into Kawalesad valley in Amboli found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.