Sindhudurg: शिवापुरातील बेपत्ता शेतकऱ्याचा मृतदेह आढळला

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 27, 2023 15:45 IST2023-07-27T15:45:09+5:302023-07-27T15:45:35+5:30

सिंधुदुर्ग : गुरे चरायला घेवून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला. तुकाराम राऊळ (वय-५०) असे मृताचे नाव आहे. या घटनेने ...

Body of missing farmer found in Sivapur | Sindhudurg: शिवापुरातील बेपत्ता शेतकऱ्याचा मृतदेह आढळला

Sindhudurg: शिवापुरातील बेपत्ता शेतकऱ्याचा मृतदेह आढळला

सिंधुदुर्ग : गुरे चरायला घेवून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला. तुकाराम राऊळ (वय-५०) असे मृताचे नाव आहे. या घटनेने कुडाळ तालुक्यातील शिवापुरात एकच खळबळ उडाली. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

कुडाळ तालुक्यातील शिवापुर येथील शेतकरी तुकाराम राऊळ हे काल, बुधवारी (दि २६) घरातून सायंकाळी गुरे चरायला घेवून गेले होते. बराच उशिर झाला पण ते घरी परतले नाहीत. यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र त्यांचा शोध लागला नाही. दरम्यान, आज पुन्हा त्यांचा  शोध घेतला असता सकाळच्या सुमारास नदीच्या पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला? यामागे घातपात असू शकतो का यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: Body of missing farmer found in Sivapur