Sindhudurg: सावंतवाडीत बहुरंगी लढती होणार, कोरगावकरांच्या बंडखोरीने भाजपची डोकेदुखी वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 16:16 IST2025-11-21T16:15:00+5:302025-11-21T16:16:41+5:30
Local Body Election: सहा नगराध्यक्षासाठी तर ८६ नगरसेवक पदासाठी उमेदवार रिंगणात

Sindhudurg: सावंतवाडीत बहुरंगी लढती होणार, कोरगावकरांच्या बंडखोरीने भाजपची डोकेदुखी वाढणार
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. मात्र नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.
तर नगरसेवक पदासाठी प्रभाग पाच मधील बंडखोर उमेदवार बबलू मिशाळ यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने शिंदेसेनेची डोकेदुखी वाढली असून सावंतवाडी शहरातील लढती या बहुरंगी होणार आहेत.
नासिर शेख, अर्चित पोकळे, गौरव जाधव, नासिर पटेल, राधिका चितारी, अस्मीता परब, जावेद शहा, शबाब शेख आदींनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. मात्र नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार कायम असून यात अन्नपूर्णा कोरगावकर व निषाद बुराण यांचे उमेदवारी अर्ज कायम असून कोरगावकर याच्या उमेदवारीमुळे भाजप ची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. तर नगरसेवक पदासाठी ८६ उमेदवार रिंगणात राहिल्याने निवडणूकीत चुरस निर्माण होणार आहे.