शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

भाजपाने केला कृषी विभागाच्या भोंगळ कारभार उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2021 2:07 PM

Bjp Sindhdudurg : कणकवली तालुका कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे अडीच महिने होऊन देखील पूर्ण करण्यात आले नसल्याने आक्रमक झालेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी शिवाजी हजारे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांना सोमवारी धारेवर धरले.

ठळक मुद्देतौक्ते वादळाने झालेल्या शेती नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत भाजपा शिष्टमंडळाकडून कृषी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती

कणकवली : तौक्ते वादळाने कणकवली तालुक्यात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना भरपाई रक्कम केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली. पण कणकवली तालुका कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे अडीच महिने होऊन देखील पूर्ण करण्यात आले नसल्याने आक्रमक झालेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी शिवाजी हजारे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांना सोमवारी धारेवर धरले.यावेळी टोलवाटोलवी करत हजारे यांनी आम्हाला काही गावामध्ये तलाठ्यांचे सहकार्य मिळत नाही आणि काही कर्मचारी रजेवर असल्याचे उत्तर देत आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र,भाजपाच्या शिष्टमंडळाने याबाबत थेट तहसीलदारांची भेट घेत ही बाब निदर्शनास आणली.यावेळी हजारे यांना कणकवली तहसीलदार कार्यालयात बोलावून घेत कुठले तलाठी सहकार्य करत नाही ते सांगा. अडीच महिने झाले तरी तौक्ते वादळाच्या भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर का जमा झाले नाहीत.

अद्याप कृषी विभागाचे पंचनामे पूर्ण का झाले नाही ? शेतकऱ्यांकडून काही आर्थिक हितसंबंध जपण्यासाठीच तुम्ही पंचनामे पूर्ण करत नाहीत का ? सावंतवाडी कुडाळ मध्ये नुकसानग्रस्तांना मदत जमा झाली व कणकवलीत का होत नाही ? अशाप्रकारे अनेक प्रश्नांचा भडीमार करत कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले . तसेच आम्हाला कारणे नकोत , शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चालढकल करणाऱ्या या बेजबाबदार कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे , अशी भूमिका घेत भाजपा पदाधिकाऱ्यांनी हजारे यांच्या विरोधात तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवा व यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली.तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळण्यास तालुका कृषी अधिकारी हेच कारणीभूत आहेत त्यांच्यावर कारवाई करा. कारवाई झाली नाही तर आम्ही तहसील कार्यालयासमोर उपोषण करू असा इशाराही भाजपाकडून देण्यात आला.

यावेळी तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री , पंचायत समिती सदस्य गणेश तांबे , नगरसेवक शिशिर परुळेकर, भाजपा प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत , भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री , असलदे सरपंच पंढरी वायगणकर , शहराध्यक्ष अण्णा कोदे , प्रदीप गावडे , बाळा पाटील , संतोष पुजारे , साहिल शिरवडेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळTahasildarतहसीलदारsindhudurgसिंधुदुर्ग