Sindhudurg: भाजप जवळचे म्हणून पदे देत नाही, प्रभाकर सावंत यांचे निलेश राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 15:27 IST2025-11-24T15:26:13+5:302025-11-24T15:27:02+5:30
सावंतवाडी : निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून युतीची चर्चा आता सगळ्यानीच बंद करावी. कामाला प्राधान्य द्या असे म्हणत भाजपचे ...

Sindhudurg: भाजप जवळचे म्हणून पदे देत नाही, प्रभाकर सावंत यांचे निलेश राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर
सावंतवाडी : निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून युतीची चर्चा आता सगळ्यानीच बंद करावी. कामाला प्राधान्य द्या असे म्हणत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कुणाच्याही टीकेला उत्तर न देता चांगल्या कामाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगितले. चार ही नगरपरिषदेत भाजपचेच वर्चस्व दिसेल. मी कुणाच्या जवळचा असण्यापेक्षा पक्षाची निष्ठा माझ्या पाठीशी असल्याने मी जिल्हाध्यक्ष झालो असल्याचा खुलासाही केला.
सावंत यांनी आज, सोमवारी सावंतवाडीतील निवडणूक कामाचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, संदीप गावडे, रविंद्र मडगावकर, गुरूनाथ पेडणेकर, शितल राऊळ आदी उपस्थित होते.
सावंत म्हणाले, भाजप सत्तेत आल्यानंतर त्या क्षेत्राचा कायापालट करते. वेंगुर्लेत भाजपची सत्ता होती. त्यावेळी देशात नावलौकिक प्राप्त केला. सावंतवाडीतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांच व्हीजन चांगलं आहे. देशात, राज्यात व्हिजनरी नेतृत्व आहे. त्यामुळे नव्या पिढीच नेतृत्व त्या करत असून सावंतवाडीकर त्यांना संधी देतील असाही विश्वास व्यक्त केला.
सावंतवाडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आदींपैकी स्टार प्रचारकांची सभा होईल, त्याबाबतची माहीती लवकरच जाहीर केली जाईल. तर जिल्हाप्रमुख संजू परब यांनी भाजपवर केलेल्या आरोपात तथ्य नाही. निलेश राणेंच्या टिकेला उत्तर देणार नाही. मी कुणाच्या जवळ असल्यानं पद मिळत नाही पक्ष निष्ठा महत्वाची आहे संघटनेत काम करावा लागत असे उत्तर त्यांनी दिले.
विशाल परब यांना भाजपात घेताना नारायण राणेंना विचारात घेतलं नाही यात कोणतही तथ्य नाही. विशाल परब हे भाजप युवा मोर्चाचे राज्याचे उपाध्यक्ष होते. राज्याच्या नेत्यांनी निलंबन रद्द केलं. वरिष्ठ पातळीवर काय ठरलं त्याबाबत कल्पना नाही.