शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएम’विरोधामागे मोठी लॉबी

By admin | Updated: October 27, 2014 23:24 IST

अजित नरदे : औरंगाबादमध्ये २९ रोजी प्रतिआंदोलन उभारणार

सांगली : जनुकीय बदलांच्या (जीएम) चाचण्यांमुळे पर्यावरणाची, आरोग्याची हानी होत असल्याची अफवा पसरवून काही लोकांनी आंदोलनाची तयारी केली आहे. या आंदोलनामागे कीटकनाशक कंपन्यांची लॉबी कार्यरत आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अजित नरदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय कोले यांनी याप्रश्नी प्रतिआंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला. नरदे म्हणाले की, कापूस शेतीत अत्यंत फायदेशीर ठरलेले जीएम तंत्रज्ञान इतर पिकात येऊ नये यासाठी जीएम मक्याच्या राहुरी आणि परभणी कृषी विद्यापीठात सुरू असलेल्या चाचणी प्रक्रियेला काही मंडळी विरोध करीत आहेत. त्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती कोळसे-पाटील यांना पुढे करीत आहेत. जीएमविरोधी आंदोलनाला शेतकरी संघटनेचा पूर्ण विरोध असून, आम्ही प्रतिआंदोलन उभारणार आहोत. येत्या २९ आॅक्टोबर रोजी औरंगाबाद येथे कृषी आयुक्त कार्यालयासमोर जीएम प्रयोगांना पाठिंबा देण्यासाठी शेतकरी संघटना पाठिंबा मेळावा घेणार आहे. जीएमला विरोध व्यक्तिगत स्वार्थापोटी सुरू आहे. आंतरराष्ट्रीय ग्रीन पीस ही संघटना त्यांच्या आंदोलनाची मुख्य सूत्रधार आहे. संस्थेचे काही पगारी कार्यकर्ते काही स्वयंसेवी संस्थांना हाताशी धरून हे आंदोलन चालवित आहेत. या आंदोलनाचा आणि शेतकऱ्यांचा काहीही संबंध नाही. आंदोलनाच्या पत्रकावर सह्या करणाऱ्या १२0 लोकांपैकी ११0 लोक शहरी आहेत. उरलेलेसुद्धा सेवा संस्थावाले आहेत. भारतीय शेतकऱ्यांना फायदेशीर असलेल्या जीएम तंत्रज्ञानापासून वंचित ठेवण्याचा डाव आखण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे कापूस उत्पादनात वाढ होऊन कीटकनाशकांच्या वापरात ८0 टक्के घट झाली आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाला विरोध करणारे पर्यावरणवादी नसून कीटकनाशक लॉबीचेच हस्तक आहेत, असा आरोप त्यांनी केला. अमेरिकेत ७0 ते ८0 टक्के अन्न हे जीएमचे असते. त्याठिकाणी लोकांच्या आरोग्याला धोका झाल्याचे एकही उदाहरण नाही. तसे झाले असते तर, जीएम अन्नावर अमेरिकेत बंदी घातली असती. जीएमला विरोध करण्याच्या मुद्द्यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही. विरोधाच्या सर्व मुद्द्यांची उत्तरे आम्ही दिली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा लोकांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)गुजरातसारखे धोरण... ऊसदराबाबत महाराष्ट्रातच अडचणी निर्माण केल्या जातात. वास्तविक गुजरातमध्ये साखरेचे पूर्ण पैसे शेतकऱ्यांना दिले जातात. बगॅस आणि मोलॅसिसवर त्यांचे कारखाने चालतात. गुजरातमध्ये अशी कारखानदारी यशस्वी होत असेल, तर मग महाराष्ट्रातच का प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शेतकरी व कारखानदार या दोन्हींना योग्य ठरेल असे धोरण हवे, असे नरदे म्हणाले.