भास्कर जाधव हे संकासूर : नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 16:05 IST2021-07-07T15:51:55+5:302021-07-07T16:05:12+5:30

NiteshRane Sindhudurg : रडीचा डाव खेळून भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करणाऱ्या शिवसेनेचे उपेक्षित नेते तथा प्रभारी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यावर भाजपचे युवा नेते, आमदार नीतेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.

Bhaskar Jadhav is Sankasur: Nitesh Rane | भास्कर जाधव हे संकासूर : नीतेश राणे

भास्कर जाधव हे संकासूर : नीतेश राणे

ठळक मुद्देभास्कर जाधव हे संकासूर : नीतेश राणेट्विटरवरून जाधव यांच्यावर जोरदार टीका

कणकवली : रडीचा डाव खेळून भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करणाऱ्या शिवसेनेचे उपेक्षित नेते तथा प्रभारी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यावर भाजपचे युवा नेते, आमदार नीतेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.

भास्कर जाधव हा संकासूर असल्याची प्रतिक्रिया आमदार राणे यांनी ट्विटरवर दिली आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या दोन दिवसीय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्याने भाजपच्या १२ आमदारांचे भास्कर जाधव यांनी निलंबन केले.



या आमदारांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप विधिमंडळाचे प्रभारी अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर नीतेश राणे यांनी ट्विटरवरून भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

आमदार भास्कर जाधव हा एक संकासूर आहे. कोकणच्या दशावतारातील संकासूर ४ वेद, ६ शास्त्र आणि १८ पुराणे चोरून समुद्राच्या तळाशी शंखात जाऊन लपला. त्याचप्रमाणे भास्कर जाधव यांनी, संविधानाने आमदारांना दिलेले अधिकार चोरून नेले आणि निलंबनाची कारवाई केली आहे, असे ट्विट नीतेश राणे यांनी केले आहे.

Web Title: Bhaskar Jadhav is Sankasur: Nitesh Rane