शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

बहुजन समाजाने सर्वोच्च लक्ष ठेवावे

By admin | Updated: July 28, 2015 21:55 IST

के. जी. कानडे : संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंतांचा सत्कार

सातारा : ‘बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील टॉप मोस्ट पदाचे लक्ष ठेवून यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावा,’ असे आवाहन रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. कानडे यांनी केले.येथील संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या गुणवंतांच्या गौरव समारंभात स्पर्धा परीक्षा तसेच पीएच.डी. पदवी प्राप्त व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. कानडे यांच्या हस्ते छ. शिवाजी महाविद्यालाच्या सभागृहात करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. विचारपीठावर छ. शिवाजी महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक डॉ. शिवाजीराव पाटील, संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळ, उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे, कार्यवाह प्रा. रमेश जाधव उपस्थित होते.डॉ. कानडे म्हणाले, ‘संबोधी प्रतिष्ठानने सामाजिक भान ठेवून चालवलेले काम भूषणावह आहे. बहुजन समाजाचे विद्यार्थी यशस्वी होताना दिसत आहेत, हे कौतुकास्पद आहे. सध्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर फार मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढली आहे. संशोधन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत. त्यासाठीची रिक्त पदे आपली वाट पाहत आहेत, हे आव्हान स्वीकारणे. चांगली गुणवत्ता व यश संपादन करण्यासाठी सातत्य ठेवून प्रयत्न करण्याची गरज आहे.’उपजिल्हाधिकारी डॉ. चारुशिला देशमुख, पीएच.डी. पदवीधारक डॉ. भास्कर कदम, डॉ. नामदेव तेलोरे (औंध ), रुचिरा इंगळे आदी गौरवार्थींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. संजय संदे यांच्या वतीने प्रा. प्रशांत साळवी यांनी सत्कार स्वीकारला. महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्राचार्य वि. न. लांडगे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. हौसेराव धुमाळ यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वस्त केशवराव कदम, रमेश इंजे, उत्तमराव पोळ, प्रा. डॉ. संजय कांबळे, विजय गायकवाड यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)