शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला', अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
5
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
6
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
7
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
8
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
9
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
10
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
11
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
12
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
13
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
14
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
15
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
16
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
17
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
18
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
19
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
20
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर

गडहिंग्लजच्या संचालकांच्या भूमिकेकडेच लक्ष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 11:36 AM

Sugar factory Gadhinglaj Kolhapur- आठवडाभरात आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना संचालकांच्या ताब्यात येईल.त्यामुळे त्यांनी आपसातील मतभेद आणि अंतर्गत गटबाजीला मुठमाती देऊन कारखान्याच्या भवितव्यासाठी एकत्र यावे, हीच ऊसकरी शेतकरी, सभासद व कामगारांची अपेक्षा आहे.म्हणूनच आता संचालकांच्या भूमिकेकडेच सर्वांचे लक्ष आहे.

ठळक मुद्देगडहिंग्लजच्या संचालकांच्या भूमिकेकडेच लक्ष !कारखान्याच्या भवितव्यासाठी सत्ताधारी - विरोधक एकत्र येणार कां?

राम मगदूम

गडहिंग्लज : आठवडाभरात आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना संचालकांच्या ताब्यात येईल.त्यामुळे त्यांनी आपसातील मतभेद आणि अंतर्गत गटबाजीला मुठमाती देऊन कारखान्याच्या भवितव्यासाठी एकत्र यावे, हीच ऊसकरी शेतकरी, सभासद व कामगारांची अपेक्षा आहे.म्हणूनच आता संचालकांच्या भूमिकेकडेच सर्वांचे लक्ष आहे.१० एप्रिलपर्यंत कारखान्याचा ताबा संचालकांकडे देण्याच्या सहकार खात्याच्या आदेशामुळे ब्रिस्क कंपनी जाणार आणि कारखाना संचालकांच्या ताब्यात येणार हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. त्यानंतर कारखाना सुरळीत चालू ठेवण्यासंदर्भात संचालक कोणती भूमिका घेणार ? त्यावरच येत्या गळीत हंगामात कारखान्याचे चाक फिरणार की नाही ? हे अवलंबून आहे.गडहिंग्लज विभागातील 'दौलत' आणि आजऱ्याची परिस्थिती विचारात घेता आपला कारखाना यापुढे सुरळीत चालू ठेवण्याचे खरे आव्हान विद्यमान संचालकांच्यासमोर आहे. त्यामुळे कारखाना स्व:बळावर चालविण्यासाठी किंवा चालवायला देण्याच्या निर्णयासाठी त्यांच्यात 'एकमत' होण्याची गरज आहे. तथापि,मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने आलेल्या ह्यब्रिस्कह्णने कालबाह्य मशिनरी आणि पोषक वातावरणाच्या अभावाचे कारण पुढे करून मुदतीपूर्वीच कारखाना सोडण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे सत्ताधारी आघाडीतील कुपेकर व मुश्रीफ समर्थक संचालक काय करणार ? हे पहावे लागेल.पूर्वइतिहास विचारात घेता कारखान्यात विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे व माजी अध्यक्ष डॉ.प्रकाश शहापूरकर यांचे कधीच जमलेले नाही.त्यामुळे शिंदेंच्या भूमिकेला विरोधी आघाडीतील शहापूरकर गटाचा पाठिंबा मिळेल,असे सध्यातरी दिसत नाही. याऊलट,'ब्रिस्क'कडे कारखाना चालवायला देण्यासाठी सहकार्य केलेल्या तत्कालीन १५ संचालकांना गेल्या निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यामुळे दुखावलेले विरोधी आघाडीचे प्रमुख माजी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण हे आता विद्यमान अध्यक्ष शिंदे व उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांच्या विचारांशी 'सहमत' झाल्याची चर्चा आहे.३० मार्च, २०२१ रोजी विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपली आहे. परंतु, कोरोनामुळे जूनपर्यंत मुदतवाढ मिळाल्यामुळे कारखान्याच्या भवितव्याचा निर्णय विद्यमान संचालकांनाच घ्यावा लागणार आहे. त्यामुळे त्यांनी एकजुटीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी सर्वांची अपेक्षा आहे.किंबहुना,त्यावरच कारखान्याचे भवितव्य अवलंबून आहे.

  •  कारखान्यातील बलाबल असे : सत्ताधारी आघाडी-१० (कुपेकर-मुश्रीफ ५, शिंदे-३, नलवडे-२)
  • विरोधी आघाडी :८ (प्रकाश चव्हाण गट -५, शहापूरकर गट -३)
टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर