शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

‘अंनिस’चे गुरुवारी राज्यभर आंदोलन : मुक्ता दाभोलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2015 00:40 IST

दाभोलकरांचे मारेकरी मोकाटच : युती सरकारला पडला विसर

दापोली : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा २० आॅगस्ट २०१३ रोजी दिवसाढवळ्या खून करण्यात आला होता. हा खून काँग्रेस सरकारच्या काळात झाला होता. त्यावेळी विरोधी बाकावर बसणारे युती सरकारला आघाडी सरकारचा राजीनामा हवा होता; मात्र ते सरकार गेले व विरोधी पक्षाचे सरकार आले. परंतु, त्यावेळी राजीनामा मागणारे युतीचे सरकार आता गप्प का? सरकारच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी अंनिस राज्यभर आंदोलने, रॅली, रस्त्यावर उतरून रिंगण नाट्य, विवेकाच्या निर्धाराची गाणी म्हणून निषेध करणार आहेत, अशी माहिती अंनिसच्या मुक्ता दाभोलकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. पुणे येथील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दाभोलकरांचा खून झाला होता त्या ठिकाणी सव्वासात वाजता सुरुवात होणार आहे. पुणे येथून सुरुवात झाल्यावर महाराष्ट्रभर सरकारचा वेगवेगळ्या पद्धतीने निषेध करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, डॉ. दाभोलकर यांचा खून म्हणजे विचारांचा खून आहे. विचारांचा विचारांनी सामना करण्याऐवजी त्यांचा खून करून विचार संपविण्याचा प्रयत्न २० आॅगस्ट २०१३ रोजी झाला. त्यांच्या खुनाला दोन वर्षे झाली. अजूनही सरकारला खुनी सापडलेला नाही. सरकारच्या कृतीचा निषेध करण्यासाठी व या दिवशी विचारांचा खून करण्यात आल्याने महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून या दिवशी राज्यातील प्रत्येक भागात अंनिस आंदोलन, निषेध मोर्चा रॅली काढून सरकारचा निषेध करणार आहे. ज्यांना यामध्ये सहभागी होता येणार नाही अशांनी काळे कपडे परिधान करून किंवा काळी फीत बांधून काळा दिवस पाळावा व सरकारचा जाहीर निषेध करावा, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला दोन वर्षे पूर्ण झाली तर कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनाला सहा महिने पूर्ण झाली. दोन्ही खुनांमध्ये साम्य आहे. खुनाच्या पद्धती सारख्या आहेत. दाभोलकर यांच्या खुनाचा तपास सीबीआय करीत आहे, तर पानसरे यांच्या खुनाचा तपास महाराष्ट्र पोलीस करीत आहेत. सीबीआय व पोलीस यांनी दोघांच्या खुनाचा तपास एकत्रितपणे करायला हवा. कारण खुनांमध्ये बरेचसे साम्य आहे; परंतु दोन्ही खुनांतील आरोपींचा शोध घेण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे सरकारच्या तपासाबद्दल शंका निर्माण होऊ लागल्या आहेत. डॉ. दाभोलकर खुनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असल्याचेही मुक्ता म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांशी २० जुलैला चर्चा झाली होती. या चर्चेत खुनाच्या तपासासंदर्भात चर्चा झाल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी सीबीआयच्या तपासासंदर्भात पंतप्रधानांशी भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी अजूनपर्यंत कोणताही संदेश न दिल्याने केवळ आश्वासन देऊन बोळवण केली असल्याचे वाटते असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून झाला तेव्हा सरकार विरोधात तांडव करणाऱ्यांनी स्वत: सत्तेत आल्यानंतर कॉ. गोविंद पानसरेंचा खून झाला तेव्हा तत्काळ खुनी पकडणे गरजेचे होते; परंतु तसे झाले नाही. तपासाला गती नाही. समकालीन सुधारकांचा दिवसा ढवळ्या खून होतो. तरीसुद्धा सरकारला खुनी सापडत नाही. समकालीन सुधारकांना खून हीच शिक्षा म्हणावी का? महापुरुष, संतांच्या महाराष्ट्रात विचारांचा खून होत असेल तर महाराष्ट्र पुरोगामी कसा? - मुक्ता दाभोलकर