शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

वेळापत्रक जाहीर : चुकीची माहिती भरल्यास कारवाई करण्याचा इशारा

By admin | Updated: January 5, 2015 18:59 IST

शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र शासन यांनी नुकतीच याबाबत घोषणा केली आहे.

टेंभ्ये : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०१४-१५ ची संचमान्यता यावर्षी प्रथमच आॅनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. सन २०१४-१५च्या संचमान्यतेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. सोमवार, दि. ५ पासून संचमान्यता प्रक्रिया सुरु होणार आहे. शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र शासन यांनी नुकतीच याबाबत घोषणा केली आहे.या संचमान्यतेसाठी ३० सप्टेंबर २०१४ची विद्यार्थीसंख्या आधारभूत धरण्यात येणार आहे, तर कर्मचाऱ्यांची माहिती १ जानेवारीची स्थिती दर्शवणारी भरावयाची आहे. आॅनलाईन पद्धतीने माहिती भरताना मुख्याध्यापकांनी युजर्स लॉगीन करावयाचा आहे. शाळेची गतवर्षीची माहिती प्रदर्शित झाल्यानंतर आवश्यतेनुसार माहिती अपडेट करावयाची आहे. भरलेली माहिती निश्चित केल्यानंतर मुख्याध्यापकांना यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. सोमवार दि. ५ जानेवारी ते सोमवार दि. १२ जानेवारी दरम्यान शाळांना आपली माहिती आॅनलाईन पद्धतीने २ूँङ्मङ्म’.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल/२ँं’ं या युआरएलवर भरता येणार आहे. दि. ५ ते १५ जानेवारीपर्यंत केंद्रप्रमुखांकडून आॅनलाईन तपासली जाणार आहे. दि. १६ ते २४ जानेवारीदरम्यान शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांच्या स्तरावरुन संचमान्यता करुन घेतली जाणार आहे.एकंदरीत यावर्षी संचमान्यता आॅनलाईन पद्धतीने करण्यात येणार असल्याने ती वेळीच पूर्ण होईल व अचूक पद्धतीने करण्यात येईल, असे सध्या म्हटले जात आहे. दि. ५ ते १५ जानेवारीदरम्यान ही माहिती आॅनलाईन मागविण्यात आली आहे. (वार्ताहर)जबाबदारी निश्चितशाळास्तरावर भरलेली माहिती केंद्रप्रमुख तपासणार आहेत. शाळा अथवा केंद्रस्तरावर माहिती चुकीची भरली गेल्यास मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख जबाबदार राहणार आहेत. सर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांची माहिती भरुन घेण्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकाऱ्यांची, जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांची, तर विभागस्तरावर शिक्षण उपसंचालकांची आहे.यावर्षी संचमान्यता आॅनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. मुख्याध्यापकांनी शाळेची माहिती वेळेत आॅनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. ती भरताना शाळेकडून चुकीची माहिती भरली गेल्यास शाळेवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.- राजेंद्र अहिरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी.