शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

Sindhudurg: एकाकी राहणाऱ्या वृद्धेचा होरपळून मृत्यू, कणकवली येथील घटना; आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 14:01 IST

फ्लॅटमध्ये अचानक आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही

कणकवली : एका वृद्ध महिलेचा आपल्या राहत्या खोलीतच जळून अत्यंत हृदयद्रावक अंत झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. कणकवली कांबळे गल्ली येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृत वृद्ध महिलेचे नाव रत्नप्रभा शंकर पंडित (८५, मूळ निवासी हळवल, ब्राह्मणवाडी) असे आहे.कणकवली येथील कांबळे गल्लीतील कामत कॉर्नर या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आपल्या भाचीच्या फ्लॅटमध्ये रत्नप्रभा पंडित गेली वीस वर्षे एकटीच राहत होती. तिचा भाचा संतोष दिनकर सुखटणकर (रा. कणकवली, जळकेवाडी) हा एमआर आहे. त्याने त्या फ्लॅटमधील हॉलच्या रूममध्ये व्यवसायासाठी आवश्यक औषधांचे बॉक्स एका बाजूला रचून ठेवले होते, त्यामुळे त्याचे अधूनमधून येणे-जाणे त्या ठिकाणी होत असे.त्या फ्लॅटच्या हॉलमध्ये रत्नप्रभा पंडित एका बाजूला लोखंडी कॉटवर झोपत असे. ती वयस्कर असल्यामुळे घरी जेवण बनवत नव्हती. तिला जेवणाचा डबा एक महिला देत असे. याशिवाय ती स्वतःच चहा व नास्ता करायची. तसेच स्वप्न पडत असल्यामुळे रात्री झोपताना आपल्याजवळच अगरबत्ती लावण्याची सवय तिला होती.सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास रत्नप्रभा हिला जेवणाचा डबा देणारी महिला त्या फ्लॅटकडे गेली; पण हाक मारून तसेच दरवाजा ठोठावूनही रत्नप्रभा हिने तो उघडला नाही. त्यामुळे त्या महिलेने संतोष सुखटणकर याला फोन करून हा विषय सांगितला. संतोष त्वरित त्या ठिकाणी गेला. प्रयत्न करूनही दरवाजा उघडत नसल्याने कटावणीच्या साहाय्याने आतील कडी काढून दरवाजा उघडला.आत पाहिले असता रत्नप्रभा होरपळलेल्या अवस्थेत कॉटच्या खाली बेशुद्ध पडलेली दिसली तसेच लोखंडी कॉटवरील गादीसह सर्व अंथरूण जळून खाक झालेले होते. तिच्या मदतीसाठी तिला रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे नेले. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.रत्नप्रभा पंडित यांचा विवाह झालेला नव्हता. फ्लॅटमध्ये अचानक आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेबाबत कणकवली पोलिस ठाण्यात संतोष सुखटणकर यांनी माहिती दिली असून, या प्रकरणाची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार विनोद सुपल करत आहेत.