शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

इच्छाशक्तीमुळेच उभारला जलसेतू

By admin | Updated: January 2, 2015 23:59 IST

प्रमोद कामत : शेर्लेवासीयांनी बांधला तेरेखोल नदीपात्रावर बंधारा

बांदा : गावाने एकजूट दाखविल्यास कोणतेही काम सहजशक्य होऊ शकते, हे शेर्लेवासीयांनी दाखवून दिले आहे. शेर्ले ग्रामस्थांनी इच्छाशक्तीच्या जोरावरच तेरेखोल नदीपात्रात जलसेतू उभारून शेर्लेवासीयांचे स्वप्न साकार केले आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत यांनी शेर्ले येथे केले. शेर्ले ग्रामस्थांनी तेरेखोल नदीपात्रावर श्रमदानाने बांधलेल्या जलसेतूच्या उद्घाटन समारंभात कामत बोलत होते. यावेळी शेर्लेचे माजी सरपंच युसुफखान बिजली यांच्या हस्ते फीत कापून जलसेतूचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेर्ले सरपंच उदय धुरी, बांदा सरपंच प्रियांका नाईक, पंचायत समिती सदस्या श्वेता कोरगावकर, शितल राऊळ, श्रीकृष्ण काणेकर, उन्नती धुरी, गुरुनाथ सावंत, डेगवे उपसरपंच मधुकर देसाई, प्रवीण देसाई, अन्वर खान, राजन कळंगुटकर, जगन्नाथ धुरी, हनुमंत आळवे, व्यापारी संघ अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर, सचिव सचिन नाटेकर, मंदार कल्याणकर, बाळा आकेरकर, श्यामकांत काणेकर, आदी उपस्थित होते. बिजली यांनी या नदीपात्रावर पूल होण्याचे स्वप्न बघितले होते. मात्र, शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे या पुलाचा प्रश्न रखडला होता. अखेर शेर्लेवासीयांनीच श्रमदानाने बंधारा उभारला. प्रमोद कामत यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी सरपंच उदय धुरी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी एकनाथ धुरी, पोलीस पाटील विश्राम जाधव, रवी आमडोसकर, दयानंद धुरी, भिकाजी धुरी, शेर्ले व्यापारी संघाचे अध्यक्ष कमलाकर नेवगी, जयवंत धुरी, संदेश पावसकर, शेखर गोवेकर, श्रीपाद पणशीकर, शशिकांत मळेवाडकर, लक्ष्मण जाधव, नंदू कल्याणकर, राजेश चव्हाण, अरुण धुरी, अजित शेर्लेकर, आनंद चव्हाण, आना धुरी, दीपक गोवेकर, अमित गोवेकर यांच्यासह शेर्ले व बांदा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेरेखोल नदीपात्रावर बंधारा बांधण्यात आल्याने स्थानिकांतून समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)