शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

कृषी समिती सभा : पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 3:39 PM

निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाईपोटी सिंधुदुर्गाला मिळालेल्या २५ कोटींपैकी नुकसानग्रस्तांपर्यंत २५ लाखसुद्धा पोहोचले नसल्याचा आरोप गटनेते रणजित देसाई यांनी करीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यपद्धतीचा निषेध केला.

ठळक मुद्देकृषी समिती सभा : पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा निषेधरणजित देसाई यांचा आरोप, सिंधुदुर्गला कोणी वाली नसल्याची टीका

सिंधुदुर्ग : निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाईपोटी सिंधुदुर्गाला मिळालेल्या २५ कोटींपैकी नुकसानग्रस्तांपर्यंत २५ लाखसुद्धा पोहोचले नसल्याचा आरोप गटनेते रणजित देसाई यांनी करीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यपद्धतीचा निषेध केला.

उदय सामंत हे रत्नागिरीचे असल्यामुळे व रायगड जिल्ह्यात तटकरे असल्यामुळे तेथे भरघोस निधी मिळतो. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्याला वाली कोण? असा प्रश्न उपस्थित करीत पालकमंत्री उदय सामंत यांना लक्ष्य केले.जिल्हा परिषद कृषी समिती सभा आॅनलाईनद्वारे बुधवारी सकाळच्या सत्रात जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती राजेंद्र म्हापसेकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी समिती सचिव तथा कृषी विकास अधिकारी सुनील चव्हाण, सदस्य गटनेते रणजित देसाई, गणेश राणे, संजय देसाई, सुधीर नकाशे, महेंद्र चव्हाण, अमरसेन सावंत आदी उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीला या महिन्यात निधन झालेले भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी, पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांचे आई-वडील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मधुसुदन बांदिवडेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २५ कोटींचे पॅकेज जाहीर केले. जुलै महिन्यात याची घोषणाही झाली. मात्र, यापैकी २५ लाखसुद्धा नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचले नसल्याचा आरोप देसाई यांनी केला. आपल्या जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे दोन आमदार, एक खासदार असूनही जिल्ह्याला वाली कोणीही नसल्याचा आरोपही देसाई यांनी केला. सुधीर नकाशे यांनीही आगपाखड केली....तर तुमची पळता भुई थोडी होईलशिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत यांना सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी वेळोवेळी घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सगळे विरूद्ध अमरसेन असे चित्र पहावयास मिळाले. जिल्हा रुग्णालयाच्या एका विषयावर गटनेते रणजित देसाई यांनी नाराजी व्यक्त केली.

जिल्हा रुग्णालयात सुविधा नाहीत. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटरवर आहे. कित्येक दिवस चादरी बदलल्या जात नाहीत. स्वच्छता नाही. यापेक्षाही भयाण परिस्थिती आहे. सगळेच बोलायला गेलो तर तुमची पळता भुई थोडी होईल अशा शब्दांत सदस्य सावंत यांना इशारा दिला.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतsindhudurgसिंधुदुर्ग