कोल्हापूर सर्किट बेंचसाठी विधी सेवा समितीवर ॲड. उमेश सावंत यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 15:12 IST2025-10-08T15:12:21+5:302025-10-08T15:12:57+5:30
मध्यस्थता समितीवरही तज्ञ मध्यस्थ म्हणून नियुक्ती

कोल्हापूर सर्किट बेंचसाठी विधी सेवा समितीवर ॲड. उमेश सावंत यांची नियुक्ती
कणकवली: मुंबई उच्च न्यायलयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी मोफत विधी सेवा समितीच्या पॅनलवर सिंधुदुर्ग जिल्हयातून कणकवली येथील प्रथितयश वकील ॲड. उमेश सुरेश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समितीच्यामार्फत ही नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनिर्मीत मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर येथील सर्किट बेंचसाठी विधी, सेवा समितीमार्फत गरजूंना मोफत विधी सेवा पुरविण्यासाठी विधीज्ञांची यादी जाहिर करण्यात आली आहे. त्यामध्ये सिंधुदुर्गमधून ॲड. सावंत यांची दिवाणी, फौजदारी व महसुली कामांसाठी पॅनलवर निवड करण्यात आली आहे.
या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोरील खटल्यांसाठी विधी सेवा समिती त्यांची नियुक्ती करू शकणार आहे. तसेच कोल्हापूर सर्किट बेंचसाठी तज्ज्ञ मध्यस्थ म्हणून निवृत्त न्यायाधिशांसोबत देखील ॲड. सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.