सिंधुदुर्ग : मुंबई - गोवा महामार्गावर हुमरमाळा येथील टाटा मोटर्स शोरूमच्या समोर कार, मोटारसायकल आणि डंपरचा अपघात झाला. अपघातात दुचाकीवरील युवक-युवती डंपर खाली चिरडून ठार झाले.अनुष्का अनिल माळवे (वय१८, रा- अणाव दाबाचीवाडी), विनायक मोहन निळेकर (२२, रा- रानबांबुळी) अशी मृतांची नावे आहेत. आज, मंगळवार सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. तर, टाटा मोटर्स शोरूमचा सिक्युरिटी गार्ड रोहित कुडाळकर याच्यासह कारमधील आठ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णाल्यात उपचार सुरू आहेत. अधिक तपास सिंधुदुर्गनगरी पोलिस करत आहेत.
Sindhudurga: मुंबई-गोवा महामार्गावर हुमरमाळा येथे अपघात, युवक-युवती ठार; आठ जण जखमी
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 13, 2025 12:02 IST