Sindhudurg: वाघिणीचा मृत्यू संशयास्पद; चौकशी करा, मनसेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 19:29 IST2025-03-08T19:28:03+5:302025-03-08T19:29:39+5:30
सावंतवाडी : दाभिल येथील सात बाव या पांडवकालीन विहिरीत वाघिणीचा संशयास्पद रित्या मृतदेह आढळून आला असून याची सखोल चौकशी ...

Sindhudurg: वाघिणीचा मृत्यू संशयास्पद; चौकशी करा, मनसेची मागणी
सावंतवाडी : दाभिल येथील सात बाव या पांडवकालीन विहिरीत वाघिणीचा संशयास्पद रित्या मृतदेह आढळून आला असून याची सखोल चौकशी करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्याकडे केली.
यावेळी रेड्डी म्हणाले, वाघिणीचा मृतदेह असल्याची घटना समजताच त्या ठिकाणी गेलो. ती वाघीण कुजलेल्या अवस्थेत होती. तिच्या शरीरावर असणारे पट्टे दिसत नव्हते. त्यामुळे आम्ही यासंदर्भात शवविच्छेदन अहवाल डेहराडून येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अस रेड्डी यांनी सांगितले.
परंतु, यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांनी हा संपूर्ण सह्याद्रीपट्टा व्याघ्र कॉरिडॉर जाहीर करा अशी मागणी केली. जिल्ह्यात असणारे पट्टेरी वाघ यांचे अस्तित्व कुठेतरी धोक्यात आहे असे सांगितलं. त्यामुळे ठीक ठिकाणी ट्रॅपिंग कॅमेरे लावण्यात यावे व या पट्टेरी वाघांचं संरक्षण करावे अशी मागणी गुरुदास गवंडे यांनी केली.
तसेच तत्कालीन उपवनसंरक्षक शहाजी नारनवर होते. त्यावेळी सन २०२२ मध्ये व्याघ्र गणना करत असताना पट्टेरी वाघांची दखल घ्यावी असे निवेदन दिले होते.आत्ता रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार आपल्याकडे आठ पट्टेरी वाघ आहेत. असं असताना जिल्ह्यात यांच्यासाठी योग्य त्या उपाययोजना करा व तसे राज्य सरकार व केंद्र सरकारला कळवा. अशी मागणी गंवडे यांनी केली.