Sindhudurg: किरकोळ कारणावरून शाळकरी मुलाने जीवन संपवले, वेत्ये येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:48 IST2025-06-06T12:46:28+5:302025-06-06T12:48:12+5:30

भाऊ व आई यांनी बघताच त्यांनी आरडाओरड करत त्याला खाली उतरवले, पण..

A schoolboy from Vetye Deulwadi in Sawantwadi taluka ended his life | Sindhudurg: किरकोळ कारणावरून शाळकरी मुलाने जीवन संपवले, वेत्ये येथील घटना

Sindhudurg: किरकोळ कारणावरून शाळकरी मुलाने जीवन संपवले, वेत्ये येथील घटना

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये, देऊळवाडी येथील एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रुद्र नारायण तेंडोलकर (१२) असे या बालकाचे नाव आहे. हा प्रकार बुधवारी रात्री घडला. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले.

सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये, देऊळवाडी येथील रुद्र तेंडोलकर या शाळकरी मुलाने किरकोळ कारणावरून घरातील छताच्या वाशाला नायलॉन दोरीने गळफास लावून घेतला. ही घटना त्याचा भाऊ व आई यांनी बघताच त्यांनी आरडाओरड करत त्याला खाली उतरवले. त्यानंतर तत्काळ गावातील ग्रामस्थांनी बेशुद्ध अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता रुद्र याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.

सावंतवाडी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेची पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय कातिवले हे करीत आहेत.

Web Title: A schoolboy from Vetye Deulwadi in Sawantwadi taluka ended his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.