शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: नांदगाव-असलदे ‘रास्ता रोको’ भोवला; राजू शेट्टी यांच्यासह ३७ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 15:10 IST

बंदी आदेशाचा भंग केल्याचा ठपका

कणकवली : आंबा-काजू बागायतदारांच्या नुकसानभरपाईसाठी सोमवारी झालेले आंदोलन आता कायदेशीर कचाट्यात सापडले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर बेकायदेशीर जमाव जमवून रस्ता अडवल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, माजी आमदार वैभव नाईक, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर आणि उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्यासह ३७ जणांवर कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.नुकसानभरपाईच्या मागणीसाठी सोमवारी असलदे पेट्रोल पंपाजवळ हे आंदोलन झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचा भंग करून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा आरोप आंदोलकांवर आहे. पोलिस कॉन्स्टेबल पांडुरंग कळंत्रे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आंदोलनादरम्यान असलदे ते नांदगाव-पाटीलवाडीदरम्यान पदयात्रा काढून सुमारे दोन तास महामार्ग रोखून धरण्यात आला होता.यामध्ये आनंद ढोके, तात्या निकम, हनुमंत म्हसकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध भागांतील ३७ कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.‘टायर’ जाळल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हाआंदोलनादरम्यान वागदे-डंगळवाडी येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या गोव्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर अज्ञात व्यक्तीने चारचाकी वाहनाचे तीन टायर जाळले. या कृत्यामुळे सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आणि मानवी जीवितास धोका पोहोचवण्याचा प्रयत्न झाला, असा ठपका ठेवत पोलिसांनी एका अनोळखी व्यक्तीविरुद्धही गुन्हा नोंदवला आहे.गुन्हा दाखल झालेल्यांची नावेपोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात वैभव नाईक (कणकवली), संदेश पारकर (कणकवली), सुशांत नाईक (कणकवली), स्वस्तिक पाटील (कोल्हापूर), राजेंद्र पाटील (जामसंडे) आणि आनंद ढोके (वाडातर) यांच्यासह देवगड, मालवण, वेंगुर्ला आणि कुडाळ तालुक्यांतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या नावांचा समावेश आहे. प्रशासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nandgaon-Asalde 'Rasta Roko' Fallout: Case Filed Against Raju Shetty, 37 Others

Web Summary : Raju Shetty and 37 others face charges for blocking the Mumbai-Goa highway during a protest for mango and cashew farmers' compensation. The demonstrators allegedly violated prohibitory orders. Separately, an unknown person is accused of burning tires on the highway, disrupting traffic.