फोंडा घाटात 6 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 08:10 IST2022-06-15T08:02:05+5:302022-06-15T08:10:56+5:30

फोंडाघाट नवीन कुर्ली वसाहत येथे एका पडवीच्या बाजूला संशयित रामचंद्र तांबे हा बॉक्स घेऊन उभा असलेला दिसून आला.

6 lakh Goa-made liquor seized in Fonda Ghat, Crime Filed | फोंडा घाटात 6 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त, गुन्हा दाखल

फोंडा घाटात 6 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त, गुन्हा दाखल

सिंधुदुर्ग/ कणकवली  : फोंडाघाट येथे कणकवलीपोलिसांनी टाकलेल्या धाडीत सहा लाख ११ हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी फोंडाघाट येथील रामचंद्र दत्ताराम तांबे (५६) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कणकवली पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, पोलीस हवालदार पी. डी. पांढरे, महिला पोलीस कुंभार यांनी ही कारवाई केली.

फोंडाघाट नवीन कुर्ली वसाहत येथे एका पडवीच्या बाजूला संशयित रामचंद्र तांबे हा बॉक्स घेऊन उभा असलेला दिसून आला. बॉक्सची तपासणी केली असता बॉक्समध्ये गोवा बनावटीचे विविध प्रकारचे गोवा बनावटीची दारू आढळून आली. कारवाईत सुमारे १२६ बॉक्स सापडले. या गोवा दारूची किंमत सहा लाख ११ हजार ७६० रुपये एवढी आहे. दरम्यान, याप्रकरणी गैरकायदा, बिगर परवाना गोवा बनावटीची दारू आढळल्या प्रकरणी रामचंद्र तांबे याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.
 

Web Title: 6 lakh Goa-made liquor seized in Fonda Ghat, Crime Filed