कणकवलीत ३ दुचाकी जाळल्या, आगीचे कारण गुलदस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 09:40 IST2020-12-09T09:40:19+5:302020-12-09T09:40:53+5:30

एक दुचाकी वाचविण्यात यश, बुधवारी पहाटेची घटना, आगीचे कारण गुलदस्त्यात

3 two-wheelers burnt in Kankavali, suspected to have set fire deliberately | कणकवलीत ३ दुचाकी जाळल्या, आगीचे कारण गुलदस्त्यात

कणकवलीत ३ दुचाकी जाळल्या, आगीचे कारण गुलदस्त्यात

कणकवली : कणकवली नागवे रोड येथे ढेकणे घराजवळ, रस्त्यालगत उभ्या केलेल्या ३ दुचाकींना बुधवार  ९ डिसेंबर रोजी पहाटे ३ च्या दरम्यान आग लावल्याची  घटना  घडली. यात २ दुचाकी  जळून खाक झाल्या आहेत. तर एक दुचाकी प्रसंगसावधानातून वाचविण्यात यश आले. ती  दुचाकी  किरकोळ जळली आहे. त्यामध्ये पांडुरंग पवार यांची डिस्कवर, मोहिते प्लेझर, पाताडे यांची पॅशन प्रो, अशा प्रकारच्या दुचाकी असून ही आग बुधवार ९ रोजी पहाटे ३ च्या दरम्यान लागली. 

आग लागली की लावली गेली याबाबत सध्या उलट सुलट चर्चा होत आहे. कारण गाड्या उभ्या असलेल्या घरा समोरील निमनकर यांच्या घराला बाहेरून कडी घालण्यात आली  होती, असे त्यांनी  सांगितले.  त्यामुळे गाड्यांना आग लावतेवेळी कोणी बाहेर येऊन आपला प्लॅन फसू नये, या उद्देशाने कडी लावली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पहाटेच घटनास्थळी येऊन पाहणी करून गेले आहेत.  पुढील तपास पोलीस करत आहेत. 

प्रकार नेमका कशातून ?
आग लावण्याची घटना कणकवलीत घडल्याने कणकवलीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी कणकवलीत गाड्यांना आग लावण्याचे प्रकार अनेकदा घडलेले असल्याने हा प्रकार नेमका कशातून झाला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 

Web Title: 3 two-wheelers burnt in Kankavali, suspected to have set fire deliberately