शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या सराफाची २७ लाखांच्या दागिन्यांची बॅग लंपास

By admin | Updated: August 23, 2015 23:29 IST

दोन लाखांची रोकड पळविली : संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

देवरूख : दादर येथील एका सोन्याच्या व्यापाऱ्याकडील २७ लाख रुपयांचे दागिने व दोन लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग थेट आरामबसमधून लांबवल्याची खळबळजनक घटना संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे शनिवारी रात्री घडली. अज्ञात चोरट्याविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राकेश महेंद्र्र जैन यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. जैन यांचा सोने, चांदीचा व्यवसाय आहे. दादर या ठिकाणी जैन यांची पेढी आहे. ते शनिवारी रात्री सोन्याचे दागिने घेऊन औदुंबर आरामबसमधून (एमएच- ४६/जे- ३६६३) रत्नागिरीहून दादरकडे जात होते. मुंबई-गोवा महामार्गावरील धामणी येथील मुकुंद कृपा हॉटेलमध्ये जेवणासाठी उतरले होते. यावेळी आपल्या ताब्यातील बॅग जैन यांनी बसमध्येच ठेवली होती. दरम्यान, आरामबसमध्ये कोणीच नसल्याची संधी अज्ञाताने साधून जैन यांची बॅग लंपास केली. जैन हे जेवण आटोपून पुन्हा आरामबसमध्ये आले असता, दागिने व रोख रक्कम असलेली बॅग गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे जैन यांच्या पायाखालची जमीन सरकली. सर्वत्र शोधाशोध करूनही बॅग न सापडल्यामुळे जैन यांनी थेट संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी धाव घेत झाडाझडती घेण्याबरोबर पंचनामा करण्यात आला. यामध्ये २७ लाख रुपयांचे चेन, नेकलेस आदी दागिने व दोन लाख रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार शनिवारी रात्री १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास घडला. जैन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात चोरट्याविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तपास पोलीस निरीक्षक मनोहर चिखले करीत आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून या चोरट्याचा शोध घेणे सोयीस्कर होईल, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)