शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

प्रतिभा डेअरीकडून शेतकर्‍यांचे २ कोटी ७७ लाख रूपये थकीत, मंत्री सामंत यांनी दिले चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 6:36 PM

सावंतवाडी : कोल्हापुरातील कोडोली येथील प्रतिभा कृषी प्रक्रिया लि. कंपनीकडून २ कोटी ७७ लाख रूपये दुधाची थकीत रक्कम सिंधुदुर्ग ...

सावंतवाडी : कोल्हापुरातील कोडोली येथील प्रतिभा कृषी प्रक्रिया लि. कंपनीकडून २ कोटी ७७ लाख रूपये दुधाची थकीत रक्कम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकर्‍यांची येणे बाकी आहे. कंपनीकडे वारंवार विनंती करूनही त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल, मंगळवारी लाक्षणिक उपोषण केले. मंत्री उदय सामंत यांनी यावर शेतकऱ्यांशी संवाद साधत संबधित कंपनीची पोलिसांकडून चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे एम.के. गावडे यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण तुर्त स्थगित केले.प्रतिभा कृषी प्रक्रिया लि. कोडोली, कोल्हापूर या कंपनीने सिंधुदूर्ग जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाकडून ११ एप्रिल २०१७ पासून दुध खरेदी सुरु केली. पहिले ६ महिने त्यांनी शेतकर्‍यांचे ठरल्याप्रमाणे पेमेंट अदा केले. दुध संकलन सुरु करण्यापूर्वी प्रतिभा दुध कंपनीचे चेअरमन सतिश चव्हाण व व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी चव्हाण यांनी शेतकर्‍यांना नवीन जनावरे, चारा, पशुखाद्य आदी देण्याबाबत मोठी आश्वासने दिली होती. मात्र एकाही आश्वासनाची पुर्तता त्यांच्याकडून झाली नाही.याउलट पुढील ६ महिन्यात प्रतिभा कंपनीकडून  शेतकर्‍यांचे दूधाचे पैसे येणे बंद झाले. याप्रश्नी अनेक वेळा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या प्रधान कार्यालयात शेतकर्‍यांसमवेत सभा आयोजित केल्या. प्रत्येक वेळी १५ दिवस महिन्याची मुदत मागून घेतली तरीही शेतकर्‍यांना पैसे प्राप्त झाले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाला दूध देणे हळूहळू बंद केले.सद्यस्थितीत  प्रतिभा  दुध कंपनीकडे जिल्ह्यातील गरीब शेतकर्‍यांच्या दूध बिलाचे, दूध संघाचे तसेच दूध बिलासाठी घेतलेले वैयक्तिक कर्ज मिळून रु. २ कोटी ७७ लाख  आणि त्यावरील व्याज रक्कम मिळून येणे आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी आपल्या गाई म्हैशी विकून बँकेचे हफ्ते दिले. वाहतूकदारांची वाहने बँकेने ओढून नेली. तसेच प्रतिभा दुध कंपनीने सिंधुदुर्ग जिल्हा दुध संघाला दिलेला ६६ लाख रूपयाचा चेक दोन वेळा बाऊस् झाला. तरीही चव्हाण कुटुंबियांना त्याच काहीच सोर सुतक नाही. त्यामुळे आम्ही आज हे उपोषण केले असल्याची कैफीयत दुध उत्पादक शेतकरी व दुध संस्थांनच्या वतीने एम.के. गावडे यांनी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दिपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या समोर मांडली.यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत ,युवा नेते संदेश पारकर यांनी संबंधित कंपनीवर कारवाई व्हावी अशी मागणी केली. त्यानंतर मंत्री सामंत यांनी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून योग्य चौकशी होईल अशी हमी ही मंत्री सामंत यांनी दिली त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गUday Samantउदय सामंतFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूरmilkदूध