कणकवलीत अवैध मद्य विक्रीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा दणका, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 01:09 PM2022-05-07T13:09:20+5:302022-05-07T13:09:54+5:30

कणकवली : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कणकवली शहरातील बीजलीनगर येथे छापा टाकत गोवा बनावटीच्या मद्यासह १४ लाखांचा मुद्देमाल ...

14 lakh worth of Goa made liquor seized in Kankavali, three charged | कणकवलीत अवैध मद्य विक्रीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा दणका, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

कणकवलीत अवैध मद्य विक्रीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा दणका, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next

कणकवली : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कणकवली शहरातील बीजलीनगर येथे छापा टाकत गोवा बनावटीच्या मद्यासह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यात ३ लाख ७२ हजार रुपयांच्या अवैध दारुसह १० लाखाची बलेनो कार, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. काल, शुक्रवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक उपनिरीक्षक रामचंद्र  शेळके यांच्यासह पथकाने मध्यरात्री ३ वाजून ५० मिनिटांनी ही कारवाई कणकवली बीजलीनगर भागात केली. याप्रकरणी तुषार विनायक तुळसकर (वय २४, रा, सावंतवाडी ), चेतन भरत वाळके (२५, रा. तीवरे ), महेश सुंदर आंबेरकर (४०, रा.जानवली) या तिघांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: 14 lakh worth of Goa made liquor seized in Kankavali, three charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.