शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शंभर कोटी वृक्षलागवड संकल्प

By admin | Updated: August 6, 2015 22:01 IST

पावसाची अनियमितता वाढली : शासनाचा महसूल, वनविभागाचा प्रयत्न

सिंधुदुर्गनगरी : अवैध वृक्षतोडीमुळे पावसाची अनियमितता वाढली आहे. त्यामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून हरित महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी शासनाच्या महसूल व वनविभागांनी सन २०१५-१६ ते सन २०१७-१८ या तीन वर्षांत राज्यामध्ये १०० कोटी वृक्षलागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.जागतिक तापमानातील वाढ आणि हवामानातील बदल याबाबत जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात विचारमंथन सुरू झाले आहे. महाराष्ट्रात वृक्षाच्छादन भौगोलिक क्षेत्राच्या २० टक्क््यांच्या जवळपास आहे. पर्यावरण संतुलन आणि समतोल राखणे आणि टिकविण्यासाठी हे प्रमाण कमीत कमी ३३ टक्क््यांपर्यंत असणे गरजेचे आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये वृक्षलागवड करून त्यातून हरित महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात आणणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ग्रामीण आणि शहरी भागातील वृक्ष लागवड आणि उत्पादनाची निर्मिती करून जैवविविधतेचे संवर्धन करणे गरजेचे आहे. ३० जुलैच्या मंत्रिमंडळ बैठकीत येत्या तीन वर्षांसाठी सन २०१५ -१६ ते २०१७-१८ या दरम्यान राज्यामध्ये १०० कोटी वृक्षलागवड होणार आहे. यासाठी नियोजन आराखडा व कृती कार्यक्रम तयार करण्यासाठी प्रधान मुख्य वनरक्षक नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय एक समिती स्थापन करण्यात आली आहे. हा अहवाल ३१ आॅगस्ट २०१५ पर्यंत शासनास सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.वृक्षांचे संरक्षण, पाणीपुरवठा, देखभाल, जोपासना आणि संगोपन, आदी कामांचे सनियंत्रण, आढावा व देखरेख करण्यासाठी राज्य, विभाग, जिल्हा, तालुका, शहर व त्यानंतर गाव स्तरावरील समित्या त्यांची रचना याची अंमलबजावणी समिती करणार आहे. (प्रतिनिधी)अशा कराव्या लागणार उपाययोजनाजिवंत रोपांची टक्केवारी ८० ते ९० टक्क्यांपर्यंत राहण्यासाठी आवश्यक संरक्षण विषयक उपाययोजना करणे.स्थानिक जिल्हा, तालुका व ग्राम पातळीवरील भौगोलिक परिस्थितीनुसार लागवडीसाठी वृक्ष प्रजातींची निवड करणे.वृक्षारोपणाच्या नियोजनात सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ, कृषी, जलसंधारण, शिक्षण, आदिवासी, ग्रामविकास, उद्योग, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, आदी विभागांना सामावून घेण्यात येणार आहे.वृक्षारोपणासाठी वन, खासगी व सार्वजनिक पडीक जमिनींचा वापर करण्यात येणार आहे.