सखी: केसांसाठी मेथीचे पाणी: केसगळती थांबवा..
आजकाल केसांच्या समस्या सामान्य आहेत. मेथी दाण्याचे पाणी हा एक नैसर्गिक उपाय आहे. मेथी दाणे, तुरटी आणि तांदूळ रात्रभर भिजवून मिश्रण तयार करा. शाम्पू प्रमाणे वापरा. हे केस मजबूत करते, चमक आणते, कोंडा कमी करते आणि केसांची वाढ जलद करते.
क्रिकेट: IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि IPL च्या इतिहासातील महागडा अनकॅप्ड खेळाडू कार्तिक शर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने चेपॉकच्या मैदानात मुंबई इंडियन्सला ८ विकेट्स राखून पराभूत केले. या विजयासह चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने प्लेऑफ्सच्या शर्यतीत आपली दावेदारी कायम ठेवली आहे. दुसरीकडे यंदाच्या हंगामातील ९ सामन्यातील सातव्या पराभवासह मुंबई इंडियन्सच्या संघानं स्वबळावर प्लेऑफ्सच तिकीट मिळवण्याची संधी गमावली आहे. आता MI च्या संगाने उर्वरित सर्व सामने जिंकले तरी स्पर्धेत टिकून राहण्याचे त्यांचे भवितव्य हे इतर संघाच्या निकालावर अवलंबून असेल.
मुंबई: नसरापूर प्रकरण: उपमुख्यमंत्री शिंदे यांचे कठोर कारवाईचे आदेश, आरोपीसाठी जलदगती न्यायालय
भोर-नसरापूर येथील साडे तीन वर्षाच्या चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच आरोपीवरील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्याला तत्काळ फाशी व्हावी, यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करावेत, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांना दिले आहेत.
मुंबई: महाजनांना जाब विचारणाऱ्या महिलेची प्रतिक्रिया: वाहतूक कोंडीत काय घडले.
टीना चौधरी यांनी मंत्री गिरीश महाजन यांना वाहतूक कोंडीबद्दल जाब विचारला. मुलीला घेण्यासाठी उशीर झाल्याने आणि पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने संतापल्याचे तिने सांगितले. कुटुंबाच्या पाठिंब्याबद्दल आणि सैन्याबद्दल आदर व्यक्त केला.
पुणे: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे
पुणे : नसरापूर (ता. भोर) येथील अल्पवयीन मुलीच्या हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मूळचा साळवडे गावचा रहिवासी असलेल्या कांबळेला त्याच्या संशयास्पद वर्तन आणि गुन्हेगारी इतिहासामुळे गावातून बाहेर काढण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
राष्ट्रीय: पश्चिम बंगाल: फेरमतदानात राडा; तृणमूल काँग्रेस-भाजप कार्यकर्ते भिडले!
पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात फेरमतदान दरम्यान तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते भिडले. येथील स्थानिक रहिवाशांनी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) नेत्यांवर धमक्या देत असल्याचे गंभीर आरोप केले. सुरक्षा दलांनी हस्तक्षेप केला; तणाव कायम. 4 मे रोजी मतमोजणी.
पिंपरी -चिंचवड: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
नसरापूर ( पुणे जि. ) : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर नसरापूर गावात तीव्र संताप उसळला असून ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतरही न्यायाच्या मागणीसाठी आंदोलन छेडले. रात्री उशिरापर्यंत रास्ता रोको, पोलीस ठाण्याला घेराव आणि दुसऱ्या दिवशी गावबंद आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
पुणे: Pune Crime: आरोपी २ वेळा बेलवर बाहेर आला अन् पुन्हा...; नसरापूर प्रकरणावर रोहित पवारांचा संताप
नसरापूर (पुणे जि.) : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधत सरकार आणि कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
व्यापार: शेअर्सला रामराम! भारतीयांचा 'या'मध्ये गुंतवणुकीचा विक्रम
भारतीय गुंतवणूक बाजारपेठेत आता तो काळ मागे पडला आहे जेव्हा शेअर बाजार म्हणजे केवळ थेट शेअर्स खरेदी करणं किंवा म्युच्युअल फंडापुरता मर्यादित होता. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या आकडेवारीनं हे सिद्ध केलंय की, भारतीय गुंतवणूकदार आता पारंपारिक मार्ग सोडून नवीन पर्यायांचा वेगाने स्वीकार करत आहेत.
पुणे: Pune Crime: नसरापूर बालिकेच्या हत्येतील आरोपीचा काळा इतिहास उघड; महिलांच्या छळाचे आरोप
नसरापूर (पुणे जि.) : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तपासादरम्यान बालिकेच्या हत्येतील आरोपीवर पूर्वीपासूनच महिलांच्या छळाचे आरोप एका प्रकरणात त्याने शिक्षा भोगल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
व्यापार: एसबीआयमध्ये ₹२,००,००० जमा करा आणि ₹१,०५,९८३ चं निश्चित व्याज मिळवा
भारतीय स्टेट बँक आपल्या ग्राहकांना बचत खात्यांवर जबरदस्त परतावा देत आहे. देशातील ही सर्वात मोठी सरकारी बँक वेगवेगळ्या मुदत ठेव (FD) खात्यांवर भरघोस व्याज ऑफर करत आहे. स्टेट बँकेमध्ये किमान ७ दिवसांच्या कालावधीसाठी देखील एफडी खातं उघडता येतं. याशिवाय, तुम्ही या बँकेत जास्तीत जास्त १० वर्षांच्या कालावधीसाठी एफडी खातं उघडू शकता.
पुणे: 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
नसरापूर ( पुणे जि. ) : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या आरोपीने “वासरू दाखवतो” असे सांगून चिमुकलीला गुरांच्या गोठ्याकडे नेले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बालिका निरागसपणे आरोपीसोबत जाताना दिसत आहे. त्यानंतर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केली आणि मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला.
व्यापार: इराण भूमिकेवरून ट्रम्प यांचा EU वर टॅरिफचा प्रहार, व्यवसायांना फटका
इराणसोबतच्या युद्धात वारंवार अमेरिकेकडे दुर्लक्ष करणं युरोपियन युनियनला (EU) महागात पडलं आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियनवर २५ टक्के टॅरिफ लादलं आहे. वास्तविक, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे ट्रम्प यांना असा टॅरिफ लावण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं होतं आणि त्यांच्या मागील सर्व टॅरिफ निर्णयांना रद्दही केलं.
छत्रपती संभाजीनगर: सुट्टीचा आनंद दुःखात बदलला; टेंभापुरी प्रकल्पात वाळूजमधील ३ तरुणांचा अंत
वाळूजमधील तीन तरुण टेंभापुरी प्रकल्पात पोहताना बुडाले. नऊ मित्रांच्या गटातील हे तरुण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने गाळात फसले. अवैध उत्खननामुळे धोकादायक खड्डे तयार झाले. पाच दिवसांपूर्वीही अशीच घटना घडली होती.
फूड: चहा पिण्याची योग्य वेळ कोणती; गोल्डन अवर कोणता?
देशभरात चहा प्रेमींची कमतरता नाही. भारत हा असा एकमेव देश आहे जिथे सर्वाधिक चहा प्यायला जातो. काही लोकांची सकाळ चहानेच होते. लोक वेगवेगळ्या प्रकारचा चहा पितात. आजकाल हर्बल टी पिणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे, परंतु दूध असलेला चहाच सर्वाधिक प्यायला जातो. चहा सर्वच पितात, पण चहा पिण्याची सर्वोत्तम वेळ कोणती हे तुम्हाला माहीत आहे का?
व्यापार: सोनं स्वस्त, चांदी महाग; पाहा काय आहेत नवे दर?
शुक्रवारी कमोडिटी बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळाली. सुरुवातीला कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण होईल अशी भीती व्यक्त केली जात होती, परंतु बाजाराची चाल याच्या उलट राहिली. एमसीएक्स (MCX) वर शुक्रवारी रात्री सुमारे ११:२१ वाजता दोन्ही मौल्यवान धातू वाढीसह व्यवहार करताना दिसले.
शिक्षण: शाळेत आईचे नाव प्रथम! कागदपत्रांवर मातेचा मान, सर्व शाळांना नियम लागू
राज्यातील शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांवर आईचे नाव प्रथम असणार आहे. या निर्णयामुळे लिंग समानता आणि आईच्या योगदानाला सन्मान मिळेल. शासकीय, अनुदानित, खासगी शाळांमध्ये नियम लागू असेल. घटस्फोटित व दत्तक पालकांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या अधिकृत नोंदींमध्ये आता आईचे नाव प्रथम नमूद केले जाणार आहे. आईचे नाव, वडिलांचे नाव, त्यानंतर आडनाव असा नवीन क्रम निश्चित करण्यात आला आहे.
राष्ट्रीय: युद्धाने तेलाचे दर वाढले; भारताला पेट्रोल-डिझेल दरवाढीचा धोका
जागतिक तणावामुळे तेलाचे दर $126 प्रति बॅरलवर पोहोचले. अमेरिका-इराणमधील चर्चा निष्फळ ठरली असून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा प्रस्ताव फेटाळल्याच्या वृत्ताने आगीत तेल ओतले आहे. जागतिक बाजारात वाढलेल्या दरामुळे भारतीय तेल कंपन्यांना आता प्रतिलिटर पेट्रोलवर १४ रुपये आणि डिझेलवर १८ रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच मोठी इंधन दरवाढ केली जाण्याची शक्यता आहे.
व्यापार: एलपीजी दरवाढीचा हॉटेल उद्योगाला फटका; खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे विस्कळीत झालेला पुरवठा आणि आता कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत झालेली मोठी वाढ यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योग संकटात सापडला आहे. कमर्शियल एलपीजीच्या किमतीतील या ताज्या वाढीमुळे हॉटेल उद्योगाला 'गंभीर झटका' बसला असून पुढील काळात परिस्थिती अधिक बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे.
मुंबई: मुंबई: कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला
मुंबईतील कुटुंबाचा मृत्यू कलिंगडामुळे झाला नाही, कलिंगडमध्ये रसायन आढळले नाही, FDA चा अहवाल. मृत्यूचे कारण अस्पष्ट; फॉरेन्सिक तपासणीवर लक्ष. गूढ वाढले.
व्यापार: भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक्स, रसायने, औषध क्षेत्र संकटात
भारतीय उद्योग कच्च्या मालासाठी चीनवर अवलंबून असून ३०% पेक्षा जास्त पुरवठा तेथून होत आहे. देशातील एकूण औद्योगिक मालाच्या पुरवठ्यापैकी तब्बल ३०.८ टक्के पुरवठा एकट्या चीनकडून होत असून, हे अतिअवलंबित्व भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक असल्याचे जीटीआरआयने आपल्या अहवालात म्हटले आहे. २०२५-२६ मध्ये भारताची एकूण आयात ७७४.९८ अब्ज डॉलरवर पोहोचली. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताला प्रमुख क्षेत्रांमध्ये देशांतर्गत क्षमता निर्माण करावी लागेल.
आंतरराष्ट्रीय: इराणवर अमेरिकेचा हायपरसोनिक क्षेपणास्त्र हल्ला? लष्करी 'प्लॅन' उघड
अमेरिका इराणवर हायपरसोनिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याच्या विचारात आहे. त्यातून लष्करी तळ आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जाईल. 'डार्क ईगल' क्षेपणास्त्र २००० मैल दूरचे लक्ष्य भेदण्यास सक्षम असून बी-१बी बॉम्बर विमानांची तैनातीने तणाव आणखी वाढला आहे. अमेरिकेने इराणवर आतापर्यंत केलेल्या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतरही त्या देशाने कडवी झुंज देण्याची तयारी सुरू केली आहे.
आंतरराष्ट्रीय: ट्रम्प यांच्या टीकेने मेलोनींना इटलीत प्रसिद्धी, तरुणाईही पाठिशी
ट्रम्प यांच्या टीकेनंतर मेलोनी अधिक लोकप्रिय झाल्या. बाह्य दबावाला झुगारून देण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे विरोधकही एकत्र आले. मेलोनी यांच्यावर झालेल्या टीकेमुळे त्यांची देशांतर्गत आणि अंतरराष्ट्रीय प्रतिमा आणखी मजबूत झाली आहे. त्यांचे राजकीय विरोधकही त्यांच्या समर्थनार्थ मैदानात आले आहेत. मेलोनींची लोकप्रियता पुन्हा झपाट्यानं वाढत असून त्यांच्या कट्टर विरोधकांनाही राष्ट्रीय सार्वभौमत्वाच्या मुद्द्यावर सरकारच्या समर्थनात उभं राहावं लागलं आहे.
क्राइम: मृत्यूची भीती दाखवून भोंदूने व्यापाऱ्याला लुटले, परदेशात मौज केली
अशोक खरात या भोंदूला एका व्यावसायिकाला फसवणूक केल्याप्रकरणी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. खरात याने परिसाची शक्ती प्राप्त करण्याकरिता २१ देशांमध्ये भ्रमण करावे लागेल व तसे न केल्यास नागदेवता तुला दंश करेल, त्यात तुझा मृत्यू होईल, अशी भीती घालून २१ देशांमध्ये भोंदू खरात हा फिर्यादीच्या पैशांवर मौज मजा करून आला.
मुंबई: बीकेसीतील सायकल ट्रॅकच्या उभारणीचा कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात
मुंबईतील बीकेसीमधील सायकल ट्रॅक तब्बल ६० कोटी रुपये खर्चून बांधले परंतु आता ते काढून टाकण्याची नामुष्की एमएमआरडीएवर ओढवली. हे ट्रॅक काढण्यासाठीच एमएमआरडीएने २५ कोटी रुपयांचा खर्च केला. रस्ते रुंदीकरणासाठी ते काढण्यात आल्याचे आता एमएमआरडीए सांगत असली तरी कोट्यवधी रुपये खर्चून ही सुविधा उभारली जाताना तिचा वापर होणार आहे की नाही, वाढणारी वाहतूक, रस्ता रुंदीकरण आदींचा अभ्यासही आधीच करणे अपेक्षित होते.
क्राइम: मुंबईत १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त, ३४९ किलो कोकेन हस्तगत
मुंबईत एनसीबीने १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले, ज्यात ३४९ किलो कोकेनचा समावेश आहे. ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’ म्हणून करण्यात आलेल्या कारवाईची तयारी सहा महिन्यांपासून सुरू होती. अमली पदार्थांच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून एनसीबीने मोठ्या प्रमाणावर कारवाईचा बडगा उगारला आहे. याच आठवड्यात कुख्यात अमली पदार्थ तस्कर आणि दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम डोला यालादेखील अटक केली आहे.
पुणे: Pune Crime : ‘आयटी मॅनेजर’ नव्हे तर ड्रायव्हर..! प्रेमसंबंध लपवून तरुणीची फसवणूक; ५ जणांवर गुन्हा
पुणे : आयटी कंपनीत ड्रायव्हर असतानाही स्वतःला मॅनेजर असल्याचे भासवून एका तरुणीची फसवणूक करत लग्न केले आणि नंतर तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
व्यापार: "एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही"
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात कच्च्या तेलाचं संकट उभं राहिलं आहे. परंतु यादरम्यान भारतानं केलेली कामगिरी मात्र कौतुकास्पद असल्याचं अनेक स्तरातून म्हटलं जातंय. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या वाहतुकीवर परिणाम होत असताना आणि किमती वाढत असताना पाकिस्ताननं केलेले दावे आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे.
व्यापार: सोनं स्वस्त, चांदी महाग; १ मे रोजीचे ताजे नवे दर काय?
शुक्रवारी सोन्याच्या किमतीत घट झाली आहे, तर चांदीच्या किमतीत तेजी आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळच्या सत्रात ट्रेडिंग बंद आहे. संध्याकाळी ५ वाजेपासून रात्री ११.३० वाजेपर्यंत यामध्ये कमोडिटी ट्रेडिंग होईल. मागील सत्रात ५ जूनच्या डिलिव्हरीचं सोनं ११४ रुपयांच्या वाढीसह १,५१,२२५ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं.
फिल्मी: राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, प्रेरणादायी पोस्ट
अभिनेत्री राजश्री देशपांडे सध्या आगामी 'बाप्या' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यासोबतच ब्रेस्ट कॅन्सरवर मात केल्याचीही तिची प्रेरणादायी कहाणी आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत कॅन्सर सर्जरीच्या खुणा आत्मविश्वासाने दाखवल्या. यात तिने महिलांना प्रेरणा देणारी पोस्टही लिहिली आहे. ती म्हणते, " माझ्या शरीरावरील या जखमा मी जिवंत असण्याची गोष्ट सांगतात. प्रत्येक जखम मला याची आठवण करून देते की मी ही लढाई लढले, त्यातून वाचले आणि त्यावर विजय मिळवला आहे. ब्रेस्ट कॅन्सरने व्रण मागे सोडले असले तरी तो माझ्या आत्म्याला कधीच स्पर्श करु शकणार नाही. प्रत्येक महिलेला मी हे सांगू इच्छिते की तुझी जिद्द कमी होण्यापूर्वी ती पुन्हा उभी राहा. तू सुंदर आहेस आणि तुझ्या अंगावरील हे व्रण डाग नसून तुमच्या धैर्याचा मुकूट आहे.
व्यापार: ट्रम्प यांचा 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' स्टंट; इराण तणावात नकाशा केला शेअर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगाला चकित केलंय. त्यांनी सोशल मीडियावर एक नकाशा शेअर केला आहे, ज्यामध्ये 'हॉर्मुझच्या सामुद्रधुनी'चं नाव बदलून 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' असं लिहिलं आहे. ट्रम्प यांनी हा नकाशा अशा वेळी शेअर केला आहे, जेव्हा अमेरिका आणि इराणमधील तणाव शिगेला पोहोचला असून आखाती देशांमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि तेलाच्या किमती सतत वाढत आहेत.