आंतरराष्ट्रीय: जगभरात शिया मुस्लिमांची संख्या किती? भारतात किती राहतात? पाहा यादी...
मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शिया आणि सुन्नी मुस्लिम समुदायांबाबतची चर्चा पुन्हा एकदा जागतिक स्तरावर तीव्र झाली आहे. इराण आणि इस्रायलमधील संघर्षानंतर हा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, जगभरात शिया मुसलमानांची संख्या किती आहे आणि कोणत्या देशांमध्ये त्यांची सर्वाधिक लोकसंख्या आहे. या यादीत भारताचाही समावेश असल्याने, भारतासह जागतिक स्तरावर शिया समुदायाची स्थिती समजून घेणे महत्त्वाचे ठरत आहे.
छत्रपती संभाजीनगर: MIM नगरसेवक मतीन पटेल अडचणीत: अनधिकृत बांधकामासाठी नोटीस
एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणी वाढल्या, पोलिसांनी त्यांच्या घरातून निदा खानला अटक केली. महापालिकेने त्यांच्या घर आणि कार्यालयातील अनधिकृत बांधकामासाठी नोटीस बजावली, तीन दिवसांत मालमत्तेची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश, अन्यथा बांधकाम तोडले जाईल. मालमत्ता अनधिकृत ठरल्यास पटेल अपात्र ठरू शकतात.
छत्रपती संभाजीनगर: वजन कमी करण्यासाठी इंजेक्शनचा ट्रेंड; डॉक्टरांचा सावधगिरीचा सल्ला
वजन कमी करण्याच्या इंजेक्शनची मागणी वाढली; सोशल मीडिया व झटपट उपायांमुळे मागणी वाढली आहे. डॉक्टरांनी जीवनशैलीत बदल महत्त्वाचे असल्याचे सांगितले. इंजेक्शन हा केवळ सहाय्यक उपाय आहे.
व्यापार: PM मोदींचं आवाहन : सोनं खरेदी टाळा, अर्थव्यवस्थेला काय फायदा होणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी तेलंगणा दौऱ्यावर होते. सिकंदराबाद येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान, त्यांनी देशातील जनतेला अनेक आवाहनं केली; यापैकीच एक आवाहन म्हणजे, पुढील एका वर्षाच्या कालावधीसाठी सोन्याची खरेदी करणं टाळावं. आता वरकरणी पाहता, पंतप्रधान मोदींचं हे आवाहन कदाचित काहीसं अनपेक्षित वाटू शकतं.
महाराष्ट्र: रिजेक्टेड माल; राहुल गांधींवर CM फडणवीसांची जोरदार टीका
जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या आर्थिक नियोजनावर राहुल गांधींनी टीका केली. यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल गांधींना 'रिजेक्टेड माल' असे संबोधत जोरदार प्रत्युत्तर दिले. फडणवीसांनी मोदींच्या आवाहनाचे समर्थन केले आणि पाकिस्तानच्या आर्थिक संकटाचा उल्लेख करत गांधींच्या समजेवर प्रश्नचिन्ह उभे केले.
व्यापार: '२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' कियोसाकी यांचा इशारा
'रिच डॅड पुअर डॅड' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आणि दिग्गज गुंतवणूकदार रॉबर्ट कियोसाकी हे त्यांच्या गुंतवणुकीच्या सल्ल्यांमुळे आणि बाजार कोसळण्याबाबतच्या भाकितांमुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, कियोसाकी यांनी पुन्हा एकदा २०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर असल्याचा मोठा इशारा दिलाय.
राष्ट्रीय: भारत कुणापुढे झुकला नाही: PM मोदी
सोमनाथ मंदिराच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी पोखरण अणुचाचणीची आठवण करून देत भारताची ताकद अधोरेखित केली. जागतिक निर्बंध असूनही, अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भारत खंबीरपणे उभा राहिला, हे त्यांनी सांगितले. सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार भारताच्या स्वतंत्र वृत्तीचे प्रतीक आहे.
छत्रपती संभाजीनगर: स्व-अभ्यासाने प्रतीक कुशारे बनले IFS अधिकारी, छत्रपती संभाजीनगरचा मान.
छत्रपती संभाजीनगरच्या प्रतीक कुशारे यांनी स्व-अभ्यासाच्या जोरावर भारतीय वन सेवेत (IFS) यश मिळवले. अनेक अपयशांवर मात करत, आई-वडिलांच्या खंबीर पाठिंब्यामुळे ते यशस्वी झाले. दिल्लीतील कोचिंगशिवाय जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यश मिळवता येते हे त्यांनी दाखवून दिले.
व्यापार: सोन्यावरील वक्तव्याने टाटाचा 'हा' शेअर गडगडला; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा फटका
टाटा समूहाची दिग्गज कंपनी असलेल्या टायटनच्या शेअर्समध्ये सोमवारी मोठी पडझड पाहायला मिळाली. सोमवारी बाजार उघडताच बीएसईवर टायटनचा शेअर ७ टक्क्यांहून अधिक घसरून ४,१५१.४० रुपयांवर पोहोचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हैदराबादमधील एका कार्यक्रमात नागरिकांना पुढील एक वर्ष सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन केलं.
नांदेड: घातक हाय बीम: नांदेडमध्ये ४ महिन्यांत २५० मृत्यू
नांदेड, परभणी आणि हिंगोलीमध्ये अवैध हाय बीम लाईटमुळे अपघात होत आहेत. चार महिन्यांत २५० हून अधिक मृत्यू आणि ६०० जखमी झाले. 'क्षणिक अंधत्व' आणि अपघात टाळण्यासाठी वाहनधारकांनी लो बीम वापरावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
व्यापार: सोन्याच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा परिणाम
लग्नसराईचा हंगाम जोरात असतानाच आज शेअर बाजारात ज्वेलरी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पुढील एक वर्ष सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन केल्यामुळे या कंपन्यांचे शेअर्स ९ ते १० टक्क्यांपर्यंत खाली आले. देशातील परकीय चलन वाचवण्यासाठी पंतप्रधानांनी हे पाऊल उचललं आहे.
व्यापार: कॅनरा बँक FD: २ लाखांच्या एफडीवर किती मिळेल व्याज? पाहा
सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य कॅनरा बँकेनं यावर्षी जानेवारीत आपल्या फिक्स्ड डिपॉझिटच्या दरांमध्ये सुधारणा केली होती. तेव्हापासून बँकेचे व्याजदर स्थिर असून, ग्राहकांना आजही आकर्षक परतावा मिळत आहे. या बँकेत मुदत ठेवींवर किमान ३.०० टक्क्यांपासून ते कमाल ७.१० टक्क्यांपर्यंत व्याज ऑफर केलं जात आहे.
फिल्मी: थलापती विजयने घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, पत्नी-मुलांची गैरहजेरी
साउथ सुपरस्टार थलापती विजयने तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत इतिहास रचला. या खास प्रसंगी विजयच्या पत्नी आणि मुलांनी मात्र या सोहळ्याकडे पाठ फिरवली. विजयची पत्नी संगीताने काही महिन्यांपूर्वी घटस्फोटाचा अर्द दाखल केला आहे. विजयचे विवाहबाह्य संबंध आणि मानसिक छळाचा आरोप तिने केला आहे. तसंच त्यांचा मोठा मुलगा जेसन संजयने आपल्या नावातून वडिलांचं नावच हटवलं आहे. विजय निवडणूक लढवत असतानाच त्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं होतं. तर दुसरीकडे त्याची अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबत जवळीक वाढलेली दिसत आहे. थपथविधी सोहळ्याला त्रिशा तिच्या आईसोबत आलेली होती यावरुन चर्चांना आणखी जोर आला आहे.
अन्य क्रीडा: भारतीय महिला तिरंदाजांचे सुवर्ण यश! शांघायमध्ये चीनला हरवले
दीपिका कुमारीसह भारतीय महिला तिरंदाजांनी शांघाय विश्वचषकात चीनला शूट-ऑफमध्ये हरवून सुवर्णपदक जिंकले. साहिल जाधवने कांस्यपदक जिंकले, ज्यामुळे भारताने दोन पदके मिळवली. हे दीपिकाचे 39 वे, अंकिताचे आठवे आणि कुमकुमचे पहिले विश्वचषक पदक आहे.
व्यापार: पेट्रोल-डिझेल दरवाढ अटळ? मोदींचे आवाहन, मंत्र्यांचे गणित, तेल एवढे महागणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करण्याचं आणि कोरोनाकाळासारखी खबरदारी घेण्याचं आवाहन केल्याने देशभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लवकरच वाढ होईल,अशी शक्यता वर्तवली जात आहे.
व्यापार: SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचा फटका; 'या' कंपन्यांचे गुंतवणूकदार मालामाल
मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअर्सचा 'सेंसेक्स' ४१४.६९ अंकांनी म्हणजेच ०.५३ टक्क्यांनी वधारून बंद झाला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 'निफ्टी ५०' निर्देशांक १७८.६ अंकांच्या म्हणजेच ०.७४ टक्क्यांच्या वाढीसह स्थिरावला. या तेजीच्या लाटेत देशातील सर्वात मौल्यवान १० कंपन्यांपैकी ६ कंपन्यांच्या बाजार भांडवलात एकूण ४६,६८५.६१ कोटी रुपयांची भर पडली, तर उर्वरित ४ कंपन्यांच्या मूल्यामध्ये एकूण १,०९,७१७.५४ कोटी रुपयांहून अधिक घट झाली.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो
नव्याने बांधलेल्या विहिरीच्या कठड्यांवर पाणी मारण्यासाठी नादुरुस्त झालेला विद्युतपंप सुरू करण्यासाठी शेतकऱ्यासह दोन्ही मुले विहिरीत उतरली आणि काळाने घाला घातला. अचानक विहीर ढासळल्याने बापासह दोन्ही मुलांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी रात्री ९.३० वाजता सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे घडली.
पुणे: जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार
राज्यातील प्रॉपर्टी कार्डला अधिकृत आणि निश्चित मालमत्तेचा दर्जा देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, भविष्यात जगातील कोणत्याही देशात हे प्रॉपर्टी कार्ड आर्थिक व्यवहारांसाठी मान्य होईल, अशी व्यवस्था निर्माण करण्याचे काम सुरू असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
नाशिक: तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची नाशिकमध्ये एसआयटीने भोंदू अशोक खरातप्रकरणी रविवारी चौकशी केली. सकाळी गुन्हे अन्वेषन विभागाच्या कार्यालयात एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते, डीवायएसपी किरणकुमार सूर्यवंशी यांनी ५० मिनिटे चाकणकर यांचा जबाब घेतला.
क्रिकेट: IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने रायपूरच्या मैदानात शेवटच्या चेंडूवर दोन धावा काढत रोमहर्षक विजय नोंदवला. या सामन्यातील पराभवासह मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या हंगामातील प्लेऑफ्सच्या शर्यतीत बाहेर पडला आहे. अखेरच्या षटकात १५ धावांचा बचाव करण्यासाठी सूर्यकुमार यादवनं राज बावावर भरवसा दाखवला. अवांतर धावा खर्च करण्यासोबत मोक्याच्या क्षणी क्षेत्ररक्षणातील चुकांमुळे MI नं स्पर्धेत टिकून राहण्याची शेवटची संधी गमावली. क्रुणाल पांड्याने ७३ धावांच्या दमदार खेळीसह RCB च्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
क्रिकेट: दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सचा स्टार फलंदाज आणि चेजमास्टर विराट कोहली खातेही उघडू शकला नाही. दीपक चाहरने पहिल्याच षटकात त्याला 'गोल्डन डक'सह तंबूत रस्ता दाखवला. आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाज असलेल्या कोहली एका हंगामात सलग दोन सामन्यात शून्यावर बाद होण्याची ही दुसरी वेळ ठरली. यंदाच्या हंगामात लखनौ पाठोपाठ MI विरुद्ध शून्यावर बाद होणारा कोहली याआधी २०२२ च्या हंगामात लखनौ आणि हैदराबाद विरुद्ध सलग दोन सामन्यात खाते उघडण्यात अपयशी ठरला होता.
राष्ट्रीय: "पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; पंतप्रधान मोदींचे आवाहन
पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर जाणवत आहेत. याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी देशवासीयांना मोठे आवाहन केले आहे. "पेट्रोल आणि डिझेलचा वापर संयमाने करायला हवा आणि 'वर्क फ्रॉम होम'ला पुन्हा प्राधान्य द्यायला हवे," असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी कोरोना काळाचाही उल्लेख केला. ते रविवारी हैदराबादमध्ये एका जाहीर सभेत बोलत होते.
क्रिकेट: उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानात अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात यजमान चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने २०४ धावांचा यशस्वी पाठलाग करुन दाखवला. हा सामना ५ विकेट्स राखून जिंकत CSK च्या संघाने प्लेऑफ्सच्या शर्यतीतील आपली आस कायम ठेवली आहे. दुसरीकडे या पराभवासह लखनौ सुपर जाएंट्सचा यंदाच्या हंगामातील प्रवास संपुष्टात आला आहे.उर्विल पटेल याच्या विक्रमी अर्धशतकासह CSK अखेर हा डाव साध्य केला आहे. २०१९ नंतर पहिल्यांदाच चेन्नईच्या संघाने १८० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करुन दाखवत गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.
राष्ट्रीय: "...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; PM मोदींची CM रेवंत रेड्डी यांना खास ऑफर
तेलंगणाला गुजरातसारखे विकास पॅकेज देण्यासंदर्भा मोदी म्हणाले, केंद्राने १० वर्षांत गुजरातला जेवढे दिले, तेवढे मी आपल्यालाही द्यायला तयार आहे. मात्र मी असे केल्यास, आपल्याला आता जे मिळतेय ते अर्धे होईल." यानंतर, मोदी हसत पुढे म्हटले, "आपल्याला जेथे पोहोचायचे आहे, पोहोचू शकणार नाही, त्यामुळे, माझ्यासोबत येणेच उत्तम! यावेळी त्यांनी जागतिक संकटात इंधन जपून वापरण्याचेही आवाहन केले.
क्रिकेट: Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
चेन्नई येथील चेपॉकच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातील स्फोटक बॅटर उर्विल पटेल याने तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करताना IPL इतिहासातील संयुक्तरित्या सर्वात जलद अर्धशतकी खेळी साकारली. १३ चेंडूत अर्धशतक पूर्ण करताना त्याने यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरीचा डाव साधला. लखनौच्या संघाने दिलेल्या २०४ धावांचा धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसन स्वस्तात माघारी फिरल्यावर पॉवर प्लेमध्ये धमाकेदार शो दाखवत त्याने नवा इतिहास रचला आहे.
राष्ट्रीय: सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती- ऋजू दत्ता
निवडणुकीनंतर सुवेंदू अधिकारी यांनी संयम दाखवल्याने ५,००० कार्यकर्त्यांची हत्या टळली, असा दावा तृणमूलचे निलंबित प्रवक्ते ऋजू दत्ता यांनी केला. दत्ता यांनी ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यावरही टीका केली.
फिल्मी: विजय मुख्यमंत्री बनताच तृषा कृष्णनची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...
दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजयने तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने सर्वांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. विजयच्या या विजयामुळे त्याचे कुटुंबीय, चाहते आणि संपूर्ण राज्यात सध्या उत्सवाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पवन कल्याण, कमल हासन आणि प्रकाश राज यांसारख्या दिग्गजांनी विजयचे अभिनंदन केले असतानाच, आता अभिनेत्री तृषा कृष्णन हिची प्रतिक्रियाही समोर आली आहे. मोजक्या शब्दांत तिने मनातील भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्र: भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकरांची चौकशी; SIT समोर जबाब नोंदवला
रूपाली चाकणकर यांची अशोक खरात प्रकरणी एसआयटी चौकशी सुरू आहे. राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा गैरवापर आणि आर्थिक व्यवहारांचे आरोप त्यांच्यावर झाले आहेत. खरात याच्या शिवानिका संस्थाच्या विश्वस्तपदी रूपाली चाकणकर होत्या. त्यामुळे आर्थिक व्यवहारांबाबतही चाकणकर यांची चौकशी करण्यात येत आहे. तर तपासात माझे पूर्णपणे सहकार्य राहील. तपास यंत्रणेला जी काही मदत लागेल ती निश्चितपणे केली जाईल असं चाकणकर यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र: खळबळजनक दावा! खरात प्रकरणात ४ मंत्री, मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अशोक खरात प्रकरणात खळबळजनक दावा केला आहे. भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्री सामील आहेत, त्याबाबत मुख्यमंत्र्यांना लवकरच पत्र पाठवणार आहे. या स्वयंघोषित बाबाने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात समाविष्ट ४ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढण्याची मागणी करणार पटोले यांनी केली आहे. तसेच खरात याच्या एन्काऊंटरची शक्यता वर्तवली आहे.
मुंबई: ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
'आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते', या वाक्याचा प्रत्यय पुन्हा एकदा मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे येत आहे. रिटा सिंग या आपल्या मुलाच्या उपचारासाठी स्वतःची एक किडनी दान करणार असून, लवकरच त्याच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार आहे.
फिल्मी: अभिनेत्री सोनम कपूरच्या मुलाचं झालं बारसं, बाळाच्या नावाचा अर्थ आहे खूपच खास
अभिनेत्री सोनम कपूरने वयाच्या ४० व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म दिला. सध्या कपूर आणि आहुजा कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे.अशातच आता सोनम कपूरने तिच्या दुसऱ्या मुलाचं नाव जाहीर केलं आहे. नुकतेच सोशल मीडियावर अभिनेत्रीने लेकाच्या नामकरण समारंभाचे फोटो शेअर केले, ज्याचं कुटुंबीय आणि चाहत्यांनी कौतुक केलं.