अभिनेत्री सोनम कपूरने मुलाचं नाव ठेवलं इतकं युनिक व सुंदर! पहिल्या लेकाच्या नावाशी आहे खास कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 09:33 IST2026-05-10T09:29:40+5:302026-05-10T09:33:33+5:30
कुर्रर्र...! अभिनेत्री सोनम कपूरच्या मुलाचं झालं बारसं, बाळाच्या नावाचा अर्थ आहे खूप खास

अभिनेत्री सोनम कपूरने मुलाचं नाव ठेवलं इतकं युनिक व सुंदर! पहिल्या लेकाच्या नावाशी आहे खास कनेक्शन
Sonam Kapoor:बॉलिवूडची ‘मसकली’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम कपूर हिने अलिकडेच एक आनंदाची बातमी दिली आहे. २९ मार्च २०२६ रोजी सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांच्या आयुष्यात दुसऱ्या बाळाचे आगमन झाले.सोनमने वयाच्या ४० व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म दिला. यामुळे सध्या कपूर आणि आहुजा कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे.अशातच आता सोनम कपूरने तिच्या मुलाचं नाव जाहीर केलं आहे.
नुकताच सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या दुसऱ्या मुलाचा नामकरण सोहळा पार पडला. अभिनेत्रीने या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिच्या मुलाचं नाव सांगितलं आहे.यावेळी सोनमने चिमुकल्या बाळाला जवळ घेतलंय, तर आनंद आहुजा यांनी मोठा लेक वायूला कडेवर घेतल्याचं पाहायला मिळतंय. सोनम आणि आनंद यांनी लेकाच्या जन्माच्या महिनाभरानंतर त्याची छोटीशी झलक दाखवली आहे.सोनम कपूरने तिच्या मुलाचं नाव रुद्रलोक असं ठेवलं आहे.या फोटोंमध्ये सोनम आणि आनंद यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे झळकत आहे.
फोटोंमध्ये सोनमने पिस्ता कलरचा ड्रेस घातला आहे. तर आनंद आहुजा पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसत आहेत. हे फोटो शेअर करत सोनमने कॅप्शनमध्ये म्हटलंय," भगवान विष्णूच्या कृपेने एकादशीच्या पवित्र दिवशी आम्हाला दुसरा पुत्र झाला. प्रेम आणि कृतज्ञतेसह, आम्ही 'रुद्रलोक कपूर आहुजा' याचे स्वागत करतो.वेदांमध्ये, 'रुद्र' हा शब्द 'रुद्' या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ 'गर्जना करणे' असा आहे. सर्व जीवांमध्ये सर्वात शक्तिशाली. जो दुःख नाहीसे करतो. वादळे आणि श्वासामागील दैवी शक्ती. त्याचा वायूशी घनिष्ठ संबंध आहे.सर्व जीवांतून वाहणारी जीवनशक्ती. आमच्या मोठ्या लेकाचं नाव वायू आहे, जो जीवनाचा आधार आहे. हे सातत्य रुद्रापासून सुरू होते. आपल्या नावाप्रमाणेच, रुद्र निर्भय, करुणामय, शक्ती-प्रकाशाचे प्रतीक बनला. तुमच्या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादांबद्दल कृतज्ञतापूर्वक,सोनम, आनंद, वायू आणि रुद्र."
दरम्यान, सोनम कपूर आणि पती आनंद आहुजा यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक बॉलिवूडसेलिब्रिटींसह नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.