(Image Credit : la100.cienradios.com)

काही लोकांना झोपेत चालायची सवय असते हे तुम्हाला माहीत असेलच. पण काही लोकांना झोपेत शारीरिक संबंध ठेवण्याची सवय असते असं ऐकलंय का? हा कोणताही गैरसमज नाही तर हे सत्य आहे. ही सेक्शुअल हेल्थसंबंधी एक समस्या आहे. याला सेक्सोम्निया (Sexsomnia) असं म्हणतात. तसेच याला स्लीप सेक्स असंही म्हणतात. यात व्यक्ती झोपेतच पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवतो.

(Image Credit : deporteysalud.hola.com)

यातील महत्वाची बाब म्हणजे जेव्हा हे लोक झोपेतून जागे होतात, तेव्हा त्यांना त्यांनी काय केलं याची अजिबात जाणीव नसते. हे एक सेक्शुअल बिहेविअर आहे. १९९६ मध्ये टोरांटो युनिव्हर्सिटीचे डॉ. कॉलिन शापिरो आणि डॉ. निक यांनी ओटावा युनिव्हर्सिटीतील डॉ.पॉल यांच्यासोबत मिळून कॅनडामध्ये यावर रिसर्च केला होता. जेव्हा रिसर्च प्रकाशित करण्यात आला तेव्हा लोक किंवा वकिल रेपच्या आरोपींना या डिसऑर्डरचा हवाला देऊन वाचवण्याचा प्रयत्न करत होते. 

सेक्सोम्नियाची काय आहे कारणे?

(Image Credit :neopress.in)

याचं मुख्य कारण अजूनपर्यंत समोर आलेलं नाही. तज्ज्ञांचं मत आहे की, जे लोक झोपेत झोपेत बोलतात किंवा चालतात, त्याच लोकांमध्ये ही समस्या होण्याचा धोका अधिक असतो. अनेकदा एखाद्या दुसऱ्या मानसिक आजारामुळे किंवा स्लीप डिसऑर्डरमुळेही ही समस्या होऊ शकते. ही समस्या झाल्यावर लोक झोपेतच त्यांच्या पार्टनरला स्पर्श करून लागतात, त्यांच्या अंगावरून हात फिरवतात आणि काही लोक हस्तमैथूनही करतात. असं पुन्हा पुन्हा केलं तर अर्थातच तुमच्या पार्टनरला त्रास होऊ शकतो. अनेकदा यात पीडित व्यक्ती जबरदस्तीने संबंध ठेवण्याचाही प्रयत्न करतो. 

नकारात्मक विचारांचा भडीमार

(Image Credit : vanguardia.com.mx)

ज्या व्यक्तीला सेक्सोम्नियाची समस्या होते. त्या व्यक्तीमध्ये चिडचिडपणा, कन्फ्यून, भिती, घृणा, लाज यांसारख्या नकारात्मक भावना घर करू लागतात. याने अनेकदा संबंध बिघडतात आणि नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचतं. काही केसेसमध्ये लैंगिक शोषणाचा आरोप लागण्याचीही भिती निर्माण होते. अशात वेळीच सेक्सॉलॉजिस्टची भेट घेऊन सल्ला घेणे महत्वाचे ठरते.

सेक्सोम्नियापासून बचावाचे उपाय

१) जर सकाळी उठल्यावर असं काही जाणवत असेल किंवा तुमचा पार्टनर रात्री झोपेत करण्यात आलेल्या हरकतींबाबत काही सांगत असेल तर व्यवस्थित ऐका. रागावू नका. आपल्या पार्टनरसोबत याबाबत मोकळेपणाने बोला. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

२) मद्यसेवन करत असाल, झोप न येण्याची समस्या असेल किंवा तणावाचे शिकार असाल तर या समस्या सर्वातआधी सोडवा. त्यासाठी जमेल ते उपाय करा.

(Image Credit : vista.sahafi.jo)

३) सेक्सोम्निया ही एक अशी समस्या आहे ज्याने तुम्हाला फार जास्त घाबरण्याची गरज आहे. कारण पुन्हा-पुन्हा असं होत असेल तर हे गंभीर आहे. याने पार्टनरची चिंता वाढू शकते. जर तुम्हाला पार्टनरसोबत संबंध ठेवण्याची इच्छा नसेल तर काही दिवस वेगळे झोपा. असं करून स्थिती हाताळण्यास मदत मिळेल.


Web Title: Trying to touch and perform sex in sleep must be suffering from Sexomnia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.