Things To Do Before And After Sex | शारीरिक संबंधाच्या आधी आणि नंतर 'या' गोष्टींची घ्या काळजी!
शारीरिक संबंधाच्या आधी आणि नंतर 'या' गोष्टींची घ्या काळजी!

शारीरिक संबंधांचा आनंद घेण्यासाठी आणि त्यानंतर कोणताही त्रास होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज असते. या गोष्टींकडे प्रकर्षानं लक्ष दिल्यास तुमचं लैंगिक जीवन अतिशय उत्तम राहू शकतं. यासाठी शारीरिक संबंधाच्या आधी आणि नंतर काही गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

दोघांची संमती गरजेची
तुम्ही विवाहित असा, बऱ्याच कालावधीपासून रिलेशनशिपमध्ये असा किंवा नुकतीच तुमच्या नात्याची सुरुवात झालेली असेल, शारीरिक संबंध ठेवताना तुमच्या पार्टनरची संमती गरजेची आहे. शारीरिक संबंध ठेवताना केवळ महिलांची परवानगी गरजेची असते असं काहींना वाटतं. मात्र शारीरिक संबंध ठेवण्याआधी त्याला दोघांची संमती आवश्यक आहे. 

कॉन्डम आणि लुब्रिकेशनचा वापर
शारीरिक संबंध ठेवताना कॉन्डमचा वापर गरजेचा आहे. यामुळे नको असलेली गर्भधारणा तर टाळता येतेच, सोबतच सेक्शुअली ट्रान्समिटेड इंफेक्शनपासूनदेखील बचाव होतो. याशिवाय गुप्तांगाला इजा होऊ नये यासाठी लुब्रिकेंटचा वापर गरजेचा आहे. तुम्ही ऑइल बेस्ड, वॉटर बेस्ड किंवा क्रीम बेस्ड लुब्रिकेंटचा वापर करू शकता. 

फोरप्ले
शारीरिक संबंधांआधी फोर प्ले गरजेचा असतो. त्यामुळे तुमचं मन आणि डोकं शांत होतं. फोर प्लेमध्ये तुम्ही जितके जास्त गुंतून जाल, तितका जास्त आनंद तुम्हाला शरीर संबंधातून मिळेल. 

शारीरिक संबंधानंतरची स्वच्छता 
शारीरिक संबंधानंतर दोघांनीही स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी. त्वचा धुण्यासाठी सॉफ्ट साबण वापरावा. शारीरिक संबंधानंतर स्वच्छतेसाठी बाजारात काही उत्पादनं उपलब्ध आहेत. यापैकी लॅक्टिक अ‍ॅसिड असलेल्या उत्पादनांचा वापर करा. त्यामुळे बॅक्टेरियाची निर्मिती रोखता येते. 
 

Web Title: Things To Do Before And After Sex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.