Sex Life : The painful sexual experience called Vaginismus | लैंगिक जीवन : 'ही' समस्या असेल तर महिला कधीही ठेवू शकत नाही शरीरसंबंध, होतात असह्य वेदना...

लैंगिक जीवन : 'ही' समस्या असेल तर महिला कधीही ठेवू शकत नाही शरीरसंबंध, होतात असह्य वेदना...

Sexual Health : शारीरिक संबंध ही एक बायलॉजिकल प्रोसेस मानली जाते. एका वयापर्यंत यासाठी शरीर सक्रिय असतं आणि नैसर्गिकपणेच यासाठी आकर्षण वाटत असतं. असं असलं तरी काही महिला अशा असतात ज्या इच्छा असूनही संभोगाचा आनंद घेऊ शकत नाही. यामागे एक असं कारण आहे ज्याबाबत फार लोकांना माहीत नसतं. ही समस्या अशी असते की, यात जर महिलेने चुकूनही शारीरिक संबंध ठेवला तर वेदनेने हैराण होईल. जणू तिच्यावर मोठा प्रहार झाल असेल.

वेजिनीस्मस

Vaginismus एक अशी स्थिती आहे ज्यातत पेनिसट्रेशन दरम्यान वजायना सेक्शनमध्ये असह्य वेदना होतात. यामुळे या भागातील मांसपेशींमध्ये तणाव येतो. ही अशी स्थिती असते जी महिला कंट्रोल करू शकत नाही. या स्थितीतून जाणाऱ्या महिलांना वेदनेचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं. कुणी वेदना सहन करू शकतात तर कुणाला असह्य होतात. वेजिनीस्मसने पीडित महिला केवळ इंटरकोर्सच नाही तर सेक्स टॉय, फिंगरिंग आणि इतकेच काय तर टेम्पॉनचा वापरही करू शकत नाहीत. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : शारीरिक संबंध न ठेवल्याने शरीरावर काय परिणाम होतो?)

याबाबत कधी कळतं?

वेजिनीस्मसबाबत महिलांना लेट टीन्स अर्ली अॅडल्टहुड किंवा पहिल्यांदा शारीरिक संबंधादरम्यान समजत असतं. सोबतच पेल्विक चेकअप दरम्यानही याची लक्षणे जाणवू शकतात. काही महिलांना याची माहिती फार उशीरा मिळते.

नेमकं कारण जाणून घेणं अवघड

हेल्थकेअर एक्सपर्ट सांगतात की, आतापर्यंत याचं ठोस कारण समोर आलेलं नाही. पण आतापर्यंतच्या रिसर्च आणि स्टडीच्या आधारावर समोर आलं आहे की, यामागे फिजिकल, सायकॉलॉजिकल आणि सेक्शुअल कारणे असू शकतात. ब्लॅडर इन्फेक्शन, यूटीआय आणि इतर प्रकारच्या काही इन्फेक्शनमुळेही ही स्थिती अधिक वाईट होऊ शकते. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : शारीरिक संबंध ठेवल्याने वजन वाढतं? जाणून घ्या तथ्य....)

ही असू शकतात कारणे

वेजिनीस्मससाठी एंग्झायटी डिसऑर्डर, बाळाच्या जन्मावेळी प्रायव्हेट पार्टमध्ये इजा होणे, एखादी सर्जरी, शारीरिक संबंधाबाबत भीती, भूतकाळात झालेल्या सेक्शुअल ट्रॉमामुळेही हे होऊ शकतं. ही समस्या असलेल्या महिलेला कसे उपचार द्यावे हे जाणून ठरवण्यासाठी आधी तिच्या कंडीशनचं कारण जाणून घेणं महत्वाचं आहे.

वेजिनीस्मस ट्रीटमेंट जास्तीत जास्त या गोष्टीवर फोकस्ड असतं की, ती कारणे दूर केले जावे ज्यांनी वजायनाच्या एरियामध्ये मसल्समध्ये तणाव येतो. यासाठी टॉपिकल थेरपी, पेल्विक फ्लोर फिजिकल थेरपी, वजायन डायलेटर, कॉग्निटिव बिहेविअर आणि सेक्स थेरपीचा वापर होतो. सोबत काउन्सेलिंगच्या आधारे भीती दूर करण्याचा प्रयत्न केला जातो.
 

Web Title: Sex Life : The painful sexual experience called Vaginismus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.