लैंगिक जीवन : शारीरिक संबंध ठेवल्याने वजन वाढतं? जाणून घ्या तथ्य....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 04:51 PM2021-02-15T16:51:18+5:302021-02-15T16:54:09+5:30

Sexual Health : हे खरं आहे की, वजन वाढण्याचं जे कनेक्शन आहे ते तुमच्या सेक्स हार्मोनशी(Sex Hormons) संबंधित आहेत. जर सेक्स हार्मोनमध्ये अनियंत्रितला आली तर वजन वाढू लागतं. पण.....

Does having more sex cause weight gain? Know the answer | लैंगिक जीवन : शारीरिक संबंध ठेवल्याने वजन वाढतं? जाणून घ्या तथ्य....

लैंगिक जीवन : शारीरिक संबंध ठेवल्याने वजन वाढतं? जाणून घ्या तथ्य....

googlenewsNext

Sexual Health : आजकाल लोक आपला  जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावर घालवतात. सोशल मीडियावर पसरलेल्या अनेक अफवांवरही लोक सहजपणे विश्वास ठेवतात. अशातच अनेक लोकांना असं वाटतं की, जास्त शारीरिक संबंध(Sex Life) ठेवल्याने वजन(Weight Gain) वाढतं. हे खरं आहे की, खोटं यावर आज आपण बोलणार आहोत.

हे खरं आहे की, वजन वाढण्याचं जे कनेक्शन आहे ते तुमच्या सेक्स हार्मोनशी(Sex Hormons) संबंधित आहेत. जर सेक्स हार्मोनमध्ये अनियंत्रितला आली तर वजन वाढू लागतं.  पण हेही खरं आहे की शारीरिक संबंध ठेवल्याने कॅलरीही बर्न(Calories) होतात. शारीरिक संबंध एक उत्तर एक्सरसाइज मानली जाते. त्यामुळे हे सत्य नाही की, शारीरिक संबंधाने(Sex) वजन वाढतं(weight Gain). पण जर सेक्स हार्मोनच्या अंसतुलनामुळे वजन वाढतं. तर असं का होतं? हे जाणून घेऊ.... (हे पण वाचा : लैंगिक जीवन : सतत पॉर्न बघितल्याने होऊ शकते 'ही' गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध!)

असंतुलित हार्मोनचं कारण

अनेकांमध्ये असंतुलित हार्मोनची स्थिती बघितली जाते. तर याची अनेक कारणे आहेत. ज्यातील एक कारण आहे जेनेटिक. जर तुमच्या पूर्वजांमध्येही सेक्स हार्मोन्सचं असंतुलन होतं, तर ते तुमच्यातही होऊ शकतं.

जर कुणाचे हार्मोन असंतुलित आहे तर हे गरजेचं नाही की, प्रत्येकवेळी कारण जेनेटिकच असेल. कारण जास्तकरून याची वेगवेगळी कारणेही असतात. जसे की, स्ट्रेस, डाएट, चुकीची लाइफस्टाइल. यासोबतच एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन टेस्टोस्टेरॉन इत्याही हार्मोन आहेत. जे वजन वाढण्याचं कारण ठरत असतात. हार्मोनमध्ये असंतुलन झाल्यावर काय लक्षणे दिसतात हे खालीलप्रमाणे सांगता येतील. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : स्वप्नात शारीरिक संबंध ठेवण्याचे 'खास' अर्थ, वाचून पडाल विचारात....)

- ज्या लोकांमध्ये हार्मोन्स असंतुलित होतात, त्यांच्या कंबरेवर आणि मांड्यांवर जास्त फॅट जमा होतं. म्हणजे जर तुम्हाला कंबरेवर आणि मांड्यांवर जास्त फॅट दिसत असेल तर समजून घ्या की, तुमचे हार्मोन असंतुलित होतं आहेत. हे तुम्हाला ठीक करण्याची गरज आहे.

- महिलांमध्ये असंतुलित हार्मोनची अनेक कारणे असू शकतात. जसे की पीरियड्सची तारीख मागे-पुढे होणे. हा तुमचे हार्मोन असंतुलित होत असल्याचा संकेत आहे. याने तुमच्यातील फॅट वाढू लागतं.

- त्यासोबतच महिलांना हॉट फ्लॅशेज होणं. हे तेव्हाच होतं जेव्हा हार्मोन्स असंतुलित होतात. जर महिलांना अचानक पुन्हा पुन्हा गरमी लागू लागते तर समजून घ्या की, त्यांना हॉट फ्लॅशेज आहे. हॉट फ्लॅशेज एंडोक्राइन हार्मोन असंतुलित झाल्याने होतं.

- जर महिलांची वजायना पुन्हा पुन्हा ड्राय होत असेल तर हेही एक मोठं कारण आहे की, तुमचे हार्मोन असंतुलित होत आहेत.

- जर तुम्हाला झोप येण्याची समस्या असेल किंवा तुम्हाला झोप येत नसेल तर तुमचे हार्मोन्स असंतुलित झालेले असू शकतात. याने तुमच्यातील फॅटही वाढतं.

- जर तुमचा मूड नेहमी नेहमी स्विंग होत असेल तर हाही एक संकेत आहे की, तुमचे हार्मोन्स असंतुलित आहेत. बऱ्याच लोकांना अचानक राग येतो किंवा त्यांना अचानक ताण जाणवतो यालाच मूड स्विंग म्हणतात.

- जर तुमचे  हार्मोन असंतुलित आहे. तर तुमची सेक्स ड्राइवही कमी होईल. सोबतच तुम्हाला डिप्रेशनचीही समस्या असेल तर तुमचे हार्मोन्स असंतुलित होऊ शकतात.

फॅट वाढण्याचं कारण

शारीरिक संबंध ठेवल्याने फॅट वाढत नाही. पण जर तुमची लाइफस्टाईल पूर्णपणे बदलत असेल तर तुमच्यातील फॅट वाढू शकतात. जर तुम्ही जास्तच कंफर्ट झोनमध्ये गेला असाल तर हे हार्मोन असंतुलनाचं एक मोठं कारण आहे. याच कारणाने तुम्ही लठ्ठ होत असता. तसेच बरेच लोक फास्ट फूड जास्त खातात त्यांच्यातही फॅट वाढतं.
 

Web Title: Does having more sex cause weight gain? Know the answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.