लैंगिक जीवन : दोघांनाही 'या' स्थितीत शारीरिक संबंध ठेवणं पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 03:51 PM2020-01-27T15:51:20+5:302020-01-27T15:52:10+5:30

अनेक शारीरिक संबंध ठेवणं हेच माहीत असतं, पण त्यांना हे माहीत नसतं की, सुरक्षित शारीरिक संबंध कसे ठेवावे किंवा काळजी काय घ्यावी.

Sex Life: How alcohol effects sexual life of males and females | लैंगिक जीवन : दोघांनाही 'या' स्थितीत शारीरिक संबंध ठेवणं पडू शकतं महागात!

लैंगिक जीवन : दोघांनाही 'या' स्थितीत शारीरिक संबंध ठेवणं पडू शकतं महागात!

googlenewsNext

दारू आणि शारीरिक संबंध असे विषय आहेत की, ज्यांच्यावर कमीच चर्चा केली जाते. त्यात जर हे दोन्ही विषय एकाच वेळी कधीच चर्चेत घेतले जात नाहीत. अशात फार कमीच लोकांना हे माहीत असेल की, त्यांच्या पिण्याच्या सवयीचा दोघांच्या लैंगिक जीवनावर कसा आणि किती प्रभाव पडतो. जर तुम्हाला याबाबत माहीत नसेल तर जाणून घ्या.

पुरूषांवर काय होतो प्रभाव?

1) इरेक्शनमध्ये(ताठरता) समस्या 

अल्कोहोलमध्ये असलेले तत्व ब्लड फ्लो स्लो करतात, ज्यामुळे इरेक्शनची समस्या होऊ शकते. त्यासोबतच याने एन्जियोटेन्सिन नावाच्या हार्मोनचं प्रमाणही वाढतं. यानेच इरेक्टाइल डिस्फक्शनची समस्या होते.

२) इजॅक्यूलेशनमध्ये(स्खलन) समस्या

जास्त दारू प्यायल्याने इजॅक्यूलेशन डिले होण्याची समस्या होऊ शकते. अल्कोहोलमुळे ऑर्गॅज्मपर्यंत पोहोचण्यासाठी ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागू शकतो. आणि इतका वेळ उत्तेजना कायम ठेवणंही कठिण असतं. अशात जास्तीत जास्त पुरूषांना संतुष्टीची जाणीव होत नाही.

३) सेक्शुअल डिझायर वाढणं

एका रिसर्चनुसार, कमी प्रमाणात मद्यसेवन केलं तर सेक्शुअल डिझायर वाढते. पण तेच जास्त प्रमाणात मद्यसेवन केलं आणि नशा चढली तर सेक्शुअल परफॉर्म करण्यात अडचण निर्माण होते.

४) सेक्शुअल रिस्क

अल्कोहोल योग्य विचार करण्याच्या आणि समजण्याच्या क्षमतेवर प्रभाव टाकतं. अशात कामेच्छा वाढल्याने पुरूष असुरक्षित संबंध किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तीसोबत संबंध ठेवण्याची भिती  असते. अशात इन्फेक्शन होण्याचा धोकाही असतो.

महिलांवर प्रभाव

१) ऑर्गॅज्ममध्ये समस्या

दारूचा प्रभाव केवळ मेंदूवरच नाही तर शरीरावरही प्रभाव करते. जास्त नशेमुळे क्लायमॅक्स फील करण्यातही अडचण येते. तसेच कमी उत्तेजना आणि त्यामुळे संतुष्टी मिळत नाही.

२) प्रायव्हेट पार्टवर प्रभाव

अल्कोहोलमुळे ब्लड फ्लोपासून ते सेक्शुअल प्लेजरवर फोकस करण्यास अडचण येते. तसेच यात व्हजायना ड्राय होऊ शकते आणि ज्यामुळे इंटरकोर्सवेळी असह्य वेदना होऊ शकतात. अशात स्थितीत रफ सेक्समुळे प्रायव्हेट पार्ट डॅमेज होऊ शकतो.

३) सेक्शुअल रिस्क

पुरूषांप्रमाणेच महिलांची सुद्धा विचार करण्याच्या आणि समजण्याच्या क्षमतेवर अल्कोहोलमुळे प्रभाव होतो. जास्त नशेमुळे महिला सेक्शुअल रिस्क घेऊ शकतात, ज्यामुळे त्यांना STD आणि गर्भधारणेचाही सामना करावा लागू शकतो.


Web Title: Sex Life: How alcohol effects sexual life of males and females

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.