लैंगिक जीवन : ४८ तासांपर्यंत तुमच्यासोबत राहतो शरीरसंबंधानंतरचा हा फायदा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 16:42 IST2021-02-04T16:42:12+5:302021-02-04T16:42:31+5:30

एक रिसर्च सायकॉलॉजीकल सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला होता. ज्यात शारीरिक संबंधानंतर आफ्टरग्लो कधीपर्यंत राहतो याबाबत माहिती देण्यात आली होती.

Post sex afterglow and this sex benefit stays with you | लैंगिक जीवन : ४८ तासांपर्यंत तुमच्यासोबत राहतो शरीरसंबंधानंतरचा हा फायदा....

लैंगिक जीवन : ४८ तासांपर्यंत तुमच्यासोबत राहतो शरीरसंबंधानंतरचा हा फायदा....

शारीरिक संबंध ठेवल्यानंतर नेहमीच आपल्या चमकत्या त्वचेबाबत कौतुक ऐकायला मिळत असेल. याला पोस्टकॉयटल चमकही म्हटली जाते. शारीरिक संबंध ठेवल्यानंतर तुमचा स्नेहपूर्ण आणि हसमुख व्यवहार असा असतो की, तुमचे सहकारी किंवा मित्र ते नोटीस करतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, चेहऱ्यावरची ही चमक तुमच्यासोबत ४८ तास राहते? एक रिसर्च सायकॉलॉजीकल सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला होता. ज्यात शारीरिक संबंधानंतर आफ्टरग्लो कधीपर्यंत राहतो याबाबत माहिती देण्यात आली होती.

अभ्यासकांना हे माहीत आहे की, शारीरिक संबंधादरम्यान शरीरातून ऑक्सीटोसिन निघतं. हा एक प्रकारचा हार्मोन असतो जो पार्टनर्समध्ये अंतरंगता वाढवण्यासाठी ओळखला जातो. याबाबत मानसोपचार तज्ज्ञांनी एक रिसर्च केला होता की, अखेर पोस्टकॉइटलची संतुष्टी आणि याचे काय काय लाभ असू शकतात. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : 'या' कारणांमुळे अनेक महिला परमोच्च सुखापासून राहतात वंचित!)

नात्याची संतुष्टी

या रिसर्चमध्ये नवविवाहितांचे दोन ग्रुप करण्यात आले होते. पहिल्या ग्रुपमध्ये ९६ जोड्यांसोबत अभ्यास केला गेला आणि दुसऱ्या टप्प्यात ११८ जोडप्यांवर अभ्यास करण्यात आला. त्यांना १४ दिवसांसाठी दैनंदिन लैंगिक क्रिया, संतुष्टीचा स्तर आणि नात्याच्या संतुष्टीवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले. रिसर्चमधून समोर आले की, सरासरी कपलने १४ दिवसांच्या काळात चार दिवस शारीरिक संबंध ठेवला.   

लैंगिक संतुष्टी वाढली

या रिसर्चमध्ये असं आढळून आलं की, सहभागी लोकांचं वय, लिंग व्यक्तित्व लक्षणे किंवा पुन्हा पुन्हा शारीरिक संबंधानंतरही त्यांनी हे सांगितले की, शारीरिक संबंध ठेवल्यानंतरही दोन दिवसांपर्यंत त्यांची लैंगिक संतुष्टी वाढली आहे. त्यामुळे त्यांना एक चांगला सेक्स आफ्टरग्लो मिळाला. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : वाढत्या वयाचा शरीरसंबंधावर कसा प्रभाव पडतो? काय असतात कारणे....)

फॅन्सी क्रीम टाकून द्या

ज्या लोकांनी एका चांगल्या सेक्स आफ्टरग्लोची सूचना दिली. ते त्यांच्या नात्याच्या सुरूवातीला आमि सहा महिन्यांनंतरही आनंदी होते. त्याचाही या रिसर्चमध्ये अभ्यास करण्यात आला. अशात तज्ज्ञ सल्ला देतात की, तुम्ही तुमचे फॅन्सी क्रीम टाकून द्या. तुमच्याकडे ग्लो मिळवण्याचा एक नैसर्गिक उपाय आहे.
 

Web Title: Post sex afterglow and this sex benefit stays with you