लैंगिक जीवन : वाढत्या वयाचा शरीरसंबंधावर कसा प्रभाव पडतो? काय असतात कारणे....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 04:18 PM2021-02-02T16:18:48+5:302021-02-02T16:29:56+5:30

रिलेशनशिपचं नेचर आणि कपल्सच्या लैंगिक जीवनाचाही यावर प्रभाव पडतो. चला जाणून घेऊ वाढत्या वयासोबत मनुष्याच्या सेक्स ड्राइव्हमध्ये कसा बदल होतो.

Why your sex drive changes with age and how to boost it | लैंगिक जीवन : वाढत्या वयाचा शरीरसंबंधावर कसा प्रभाव पडतो? काय असतात कारणे....

लैंगिक जीवन : वाढत्या वयाचा शरीरसंबंधावर कसा प्रभाव पडतो? काय असतात कारणे....

googlenewsNext

(Image Credit : Getty Images)

वाढत्या वयासोबत माणसाच्या कामोत्तेजनेत अनेक बदल होतात. हार्मोन्सच्या बदलामुळे पुरूष आणि महिलांमद्ये सेक्स ड्राइव्हसंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. त्यासोबतच सायकॉलॉजिकल, इमोशनल आणि फिजिकल गोष्टीही पुरूष आणि महिलांच्या सेक्स ड्राइव्हमध्ये बदलासाठी एकत्र काम करतात. रिलेशनशिपचं नेचर आणि कपल्सच्या लैंगिक जीवनाचाही यावर प्रभाव पडतो. चला जाणून घेऊ वाढत्या वयासोबत मनुष्याच्या सेक्स ड्राइव्हमध्ये कसा बदल होतो.

२० ते २९ वयात काय होतं?

२० ते २९ वयात पुरूषांना टेस्टोस्टेरॉनमुळे हायर सेक्स ड्राइव्हचा अनुभव घेतात. या काळात कामोत्तेजनेसाठी आवश्यक हार्मोन सामान्यापेक्षा जास्त लेव्हलचे असतात. मात्र, अनेकदा पुरूषांना त्यांच्या परफॉर्मन्सचीही चिंता असते. ज्यामुळे ते इरेक्टाइल डिसफंक्शनचे शिकार होतात. तेच या वयात महिलाही सर्वात जास्त फर्टाइल असतात. पण शारीरिक संबंधाबाबत फार गंभीरही असतात. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : ऐनवेळी अनेक कपल्सना राहते परफॉर्मन्सची चिंता, 'हे' उपाय ठरतील फायदेशीर....)

३० वयात सगळं चांगलं

एक्सपर्ट सांगतात की, ३० वयानंतरही पुरूषांची सेक्स ड्राइव्ह खूप मजबूत असतात. पण ४० वयापर्यंत पोहोचताना हळूहळू कमजोर पडू लागते. हा असा काळ असतो जेव्हा ते आपल्या करिअरवर, परिवारावर आणि वैवाहिक जीवनावर अधिक लक्ष केंद्रीत करत असतात. याने त्यांची कामोत्तेजना प्रभावित होते.

प्रेग्नेन्सीचा काळ

पुरूष आणि महिला प्रेग्नन्सी दरम्यान वेगवेगळ्या फेजमधून जात असतात. यादरम्यान महिलांच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात. त्यांचे हार्मोन्सची प्रभावित होतात. तेच पुरूषही एका सायकॉलॉजिकल फेजमधून जातात. जिथे  दोघांनी हाय सेक्स ड्राइव्हचा अनुभव होतो. बाळाच्या जन्मानंतर कपल्सच्या लाइफमध्ये इमोशनल आणि सायकॉलॉजीकल दबाव वाढू लागतो. ब्रेस्टफीडिंग, बाळाचा सांभाळ आणि कामाचं टेन्शन या गोष्टीही कपलच्या लैंगिक जीवनावर प्रभाव करतात.

४० वयानंतर काय होतं?

४० किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या पुरूष आणि महिलांना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. याचाही परिणाम त्यांच्या सेक्स ड्राइव्हवर होतो. आरोग्यासंबंधी समस्या जसे की, हार्ट डिजीज, डायबिटीज आणि कोलेस्ट्रॉलमुळे पुरूषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शनची धोका वाढतो. यादरम्यान ते अनेक औषधे घेतात ज्यामुळे त्यांच्या कामोत्तेजनेवर प्रभाव पडतो. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : मद्यसेवनामुळे कामेच्छा खरंच कमी होते का? वाचा तज्ज्ञांचं मत..)

तेच या वयातील महिला मेनोपॉजकडे पुढे जातात. त्यांना सेक्स ड्राइव्हमध्ये कमतरता जाणवू लागते. त्यांचं वजन अचानक वाढू लागतं आणि झोपेची समस्या वाढू लागते. याप्रकारचे आणखीही काही परिवर्तन होतात जे शारीरिक संबंध ठेवण्यापासून त्यांना दूर ठेवतात.

डॉक्टरांशी कधी संपर्क साधावा

सेक्स ड्राइवशी संबंधित समस्या झाल्यावर संबंधित व्यक्तीने डॉक्टरांशी संपर्क साधणं हाच योग्य उपाय ठरतो. जर तुम्हाला सेक्स ड्राइवसंबंधी समस्या असेल तर आणि पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवण्यात इंटरेस्ट राहिला नसेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. मग तुमचं वय काहीही असो.

एक्सरसाइज आणि आहार

एक्सपर्ट दावा करतात की, योग्य लाइफस्टाईल अंगीकारली तर व्यक्तीच्या सेक्स ड्राइव चांगल्या होतात. आपण आपल्या डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. हिरव्या पालेभाज्या, फळं यांचं सेवन करा. त्यासोबत रोज एक्सरसाइज करूनही तुम्ही सेक्स ड्राइव चांगल्या ठेवू शकता.
 

Web Title: Why your sex drive changes with age and how to boost it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.