लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर दुसऱ्या दिवशी मूडवर कसा पडतो प्रभाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 03:00 PM2019-10-03T15:00:17+5:302019-10-03T15:00:28+5:30

शारीरिक संबंधाचे अनेक फायदे तुम्ही वाचले असतील. याने स्कीनवर ग्लो येतो, कॅलरी बर्न होतात. तसेच एक्सरसाइजही होते. स्ट्रेस दूर होतो इत्यादी इत्यादी.

Know benefits of good sex it affects your mood | लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर दुसऱ्या दिवशी मूडवर कसा पडतो प्रभाव?

लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर दुसऱ्या दिवशी मूडवर कसा पडतो प्रभाव?

googlenewsNext

शारीरिक संबंधाचे अनेक फायदे तुम्ही वाचले असतील. याने स्कीनवर ग्लो येतो, कॅलरी बर्न होतात. तसेच एक्सरसाइजही होते. स्ट्रेस दूर होतो इत्यादी इत्यादी. पण काय शारीरिक संबंधाने जीवनाचा स्तरही सुधारला जातो? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी रिसर्चही करण्यात आला होता. याचा उद्देश हा होता की, शारीरिक संबंधाने आपल्या भावनिक आरोग्यावर आणि आकलनावर सकारात्मक प्रभाव पडतो का?

दुसऱ्या दिवसापर्यंत राहतो सकारात्मक प्रभाव

काही अभ्यासकांनी यावर अभ्यास केला आणि इमोशन्स नावाच्या जर्नलमध्ये हा रिसर्च प्रकाशित केला. या रिसर्चमधून समोर आले की, शारिरिक संबंधाचा सकारात्मक प्रभाव दुसऱ्या दिवसापर्यंत राहतो. पण तुमचं सेक्शुअल रिलेशन कसं आहे. यावर ही गोष्ट अधिक अवलंबून असते.

सॅटिस्फॅक्शन लेव्हल रोकॉर्ड

रिसर्चमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांची सेक्शुअल अ‍ॅक्टिविटी आणि २१ दिवसांपर्यंत त्यांचं सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन रेकॉर्ड करण्यात आलं. या रिसर्चमध्ये १८ ते २० लोक वॉलेंटीअर म्हणून सहभागी झाले होते. यात ७६ टक्के महिला होत्या, यातील ६४ टक्के महिला रिलेशनशिपमध्ये होत्या. 

शारीरिक संबंधाने मिळाली सकारात्मकता

या रिसर्चमधून हा निष्कर्ष निघाला की, ज्या दिवशी लोक शारीरिक संबंध ठेवतात. त्यांना जास्त सकारात्मक आणि मोकळेपणा जाणवतो. या लोकांचा मूड दुसऱ्या दिवसापर्यंत चांगला राहतो.

कॅज्युअल की इमोशनल सेक्स

एखाद्या प्रेमाच्या नात्यात ठेवला गेलेला शारीरिक संबंध आणि कॅज्युअल डेटमध्ये ठेवण्यात आलेला शारीरिक संबंध यात काहीही फरक बघायला मिळाला नाही. दोन्हीतून सकारात्मकता बघायला मिळाली.

Web Title: Know benefits of good sex it affects your mood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.