जिल्हा परिषद स्थायी समितीची आज सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:26 IST2021-07-02T04:26:39+5:302021-07-02T04:26:39+5:30

सातारा : जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती आणि जलसंधारण समितीची मासिक सभा शुक्रवारी होणार आहे. या सभेत कोरोना तसेच ठेकेदार ...

Zilla Parishad Standing Committee meeting today | जिल्हा परिषद स्थायी समितीची आज सभा

जिल्हा परिषद स्थायी समितीची आज सभा

सातारा : जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती आणि जलसंधारण समितीची मासिक सभा शुक्रवारी होणार आहे. या सभेत कोरोना तसेच ठेकेदार अनामत रक्कम परत करण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही सभा होणार आहे. अध्यक्ष उदय कबूले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहेत. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, ग्रामपंचायतचे अविनाश फडतरे, अर्थ व शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी समिती सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण समिती सभापती कल्पना खाडे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सोनाली पोळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी ११ वाजता जलसंधारण आणि दुपारी एक वाजता स्थायी समिती सभा होणार आहे.

Web Title: Zilla Parishad Standing Committee meeting today